नवी दिल्ली, 5 मे : सरकारने परदेशी नागरिकांसाठी दिलेला व्हिसा (काही श्रेणींच्या सोडून) लॉकडाऊनमध्ये आतंरराष्ट्रीय उड्डाणे (International Flights) बंद असेपर्यंत रद्द केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने स्वतंत्रपणे एका आदेशात म्हटले आहे की, त्यांनी कोरोना व्हायरसमुळे लागू लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांचा व्हिसा निशुल्क आधारावर वाढवला आहे. हा अवधी आतंरराष्ट्रीय हवाई यात्रा सुरू झाल्यानंतर पुढे 30 दिवसांसाठी असेल. गृह मंत्रालयाने असेही सांगितले की, त्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित असेपर्यंत भारतातील प्रवासी नागरिक ( ओसीआय) कार्डधारकांना आणि आजीवन व्हिसावरील यात्रा स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये सांगितले आहे की, पहिल्यापासून भारतात राहणारे ओसीआय कार्डधारक येथे कितीही काळासाठी राहू शकतात. आदेशात सांगण्यात आले आहे की राजकीय, संयुक्त राष्ट्राचे आतंरराष्ट्रीय संघटना, रोजगार आणि परियोजना श्रेणीव्यतिरिक्त परदेशींना दिलेले सर्व तत्कालिन व्हिजा तेव्हापर्यंत निलंबित राहतील जोपर्यंत भारत सरकार येथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवासावरील निर्बंध हटविण्यात येत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध नियमावली लागू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वच स्तरावरील प्रवास पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. संबंधित - दारुमुळे अख्खं कुटुंब झालं उद्ध्वस्त; पती-पत्नीमधील वादामुळे 4 जणांचा गेला बळी महिला झाल्या आक्रमक; भाजी बाजार 3 तास आणि दारुची दुकाने 7 तास खुली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.