मॉस्को, 24 जून : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गेल्या 23 वर्षांपासून सत्तेवर आहेत. मात्र, सध्या त्यांच्यासाठी परिस्थिती बिकट झाली आहे. वॅगनर ग्रुपच्या बंडखोरीनंतर पुतीन यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पुढील एक-दोन दिवस रशियासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पाश्चात्य माध्यमांनी म्हटले आहे. बंडखोर वॅगनर ग्रुपने दोन शहरे ताब्यात घेतली असून मॉस्कोवर चाल करुन येत असल्याने धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी रशियन सैन्याला बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, पुतिनसाठी पुढील 24 तास निर्णायक ठरू शकतात. दुसरीकडे वॅगनर ग्रुपची बंडखोरी युक्रेनसाठी मोठा दिलासा आहे. नेमकं काय घडलं? युक्रेन युद्धानंतर रशियन सैन्यामधून अनेक प्रकारच्या गोष्टी समोर आल्या आहेत. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया-युक्रेन युद्धानंतर व्लादिमीर पुतिन यांच्यावर त्यांच्याच देशात याआधीही टीका झाली होती. मात्र, या टीकेनंतर अनेक विरोधक अचानक गायब झाल्याचीही प्रकरणे वाढली आहेत. काही जण अपघाताचे बळी ठरले तर काही इतर कारणांमुळे मृत्यूमुखी पडले. या वेळी वॅगनर आर्मीच्या बंडामुळे जगातील पाचव्या क्रमांकाच्या लष्करासमोर सर्वात महत्त्वाचे आव्हान उभे राहिले आहे. सैन्याची ही लढाई त्यांच्याच सैनिकांशी सुरू आहे, हे बंड लवकर शमवलं नाही तर मॉस्कोच्या पतनाचे कारणही बनू शकते. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन सुरुवातीपासूनच पुतिनविरोधात बोलले आहेत. युक्रेनबरोबरच्या युद्धानंतर त्यांच्या भूमिकेकडे पूर्वी शो ऑफ म्हणून पाहिले गेले होते. आताची परिस्थीती वेगळी आहे. आज वॅगनर गट पुतीन यांच्या अधिकाराला आव्हान देत समोर उभा राहिला आहे. रोस्तोव ऑन डॉन हा त्यांचा मुख्य लष्करी तळ त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पुतीन यांना मान्य करावे लागत आहे. वाचा - ज्या पाणबुडीत गेला 5 अब्जाधीशांचा जीव; इतकं कोटी होतं त्याचं तिकीट वॅगनर ग्रुपच्या कॅम्पवर हवाई हल्ला कोणी केला? मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॅगनर ग्रुप बऱ्याच काळापासून बंडखोरीच्या रस्त्यावर सक्रिय होता. या बंडाचा परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहे. जंगलातील वॅगनर कॅम्पवर हवाई हल्ल्यानंतर बंडखोर संतप्त दिसत आहेत, ज्यामध्ये रशियन संरक्षण मंत्रालयाने कोणतीही भूमिका नाकारली आहे. रशियातील बंडामुळे युक्रेनला काय फायदा? रशियातील बंडामुळे युक्रेनल मोठा दिलासा मिळाला आहे. रिपोर्टनुसार, युक्रेन कदाचित रशियामधील या घडामोडींचा उत्सव साजरा करत असेल. हे असेच चालू राहिल्यास युद्धाचं पारडं कीवच्या बाजूकडे झुकेल. मात्र, आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर रशिया किंवा कोठेही बंडखोरी क्वचितच यशस्वी झालेली पाहायला मिळाली आहे. 1917 मध्ये रशियामध्ये झार निकोलस II च्या हकालपट्टीमुळे बोल्शेविक क्रांती, लेनिन आणि नंतर सोव्हिएत साम्राज्य झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.