न्यूयॉर्क, 28 मार्च : टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचे (SpaceX) सीईओ एलोन मस्क (Elon musk) पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. इलॉन मस्क यांनी सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले की, त्यांना पुन्हा एकदा कोविड-19 (Covid-19) झाला आहे. मात्र, यावेळी त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याचे त्यांनी सांगितले. इलॉन मस्कने लिहिले, ‘कोविड सतत रंग बदलत आहे. मला पुन्हा कोरोना झाला आहे असे दिसते, पण कोणतेही लक्षण नाही. यापूर्वी नोव्हेंबर-2020 मध्ये देखील एलोन मस्क यांना कोविड-19 झाला होता. टेस्लाच्या सीईओने लिहिले, ‘वेगवेगळ्या लॅबचे वेगवेगळे परिणाम मिळत आहेत. पण यावेळी सौम्य कोविड होण्याची शक्यता आहे.
Covid-19 is the virus of Theseus.
— Elon Musk (@elonmusk) March 28, 2022
How many gene changes before it’s not Covid-19 anymore?
I supposedly have it again (sigh), but almost no symptoms.
एलोन मस्क यांनी घेतलीय कोविड प्रतिबंधक लस डिसेंबर-2021 मध्ये एका मुलाखतीदरम्यान एलोन मस्क यांनी सांगितले होते की, त्यांना आणि त्यांच्या मुलांना कोविड प्रतिबंधक लस मिळाली आहे. वास्तविक, पुन्हा एकदा कोरोना नवीन रूपे घेऊन जगभर आपले पाय पसरवत आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट (Naftali Bennett) हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधानांची तब्येत फारशी बिघडलेली नाही आणि त्यामुळे ते घरीच आयसोलेशनमध्ये काम पाहतील.
Alipay च्या माध्यमातून चीनची भारताविरोधात कुरापत, नेपाळींना देतोय 2000 रुपयांची लालूच!2020 मध्ये एलोन मस्क यांना शेवटच्या वेळी कोरोना झाला होता. त्यानंतर मस्क यांनी ट्विटरवर लिहिले, ‘लक्षणे दिसल्यानंतर एकाच दिवसात चार वेळा कोरोना टेस्ट केल्या. दोन पॉझिटीव्ह आणि दोन निगेटिव्ह होते. तीच मशीन, तीच चाचणी, तीच परिचारिका. एकप्रकारे त्यांनी चाचणी पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले होते.