मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Social Media स्टारची आत्महत्या; अपमानास्पद कमेंट्स, ट्रोलिंगमुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Social Media स्टारची आत्महत्या; अपमानास्पद कमेंट्स, ट्रोलिंगमुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Kristina Kika Dukic ही सामान्य मुलगी नव्हती. तिला Instagram, YouTube आणि Twitch वर 10 लाख लोक फॉलो करत होते. तिला फॉलो करणाऱ्यांना तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे वेड लागले होते.

मुंबई, 12 डिसेंबर : सोशल मीडियामुळे अनेक स्टार आज समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. यामागे त्यांची मेहतनही तितकीच असते. त्यामुळे हजारो लाखो जणांचं प्रेम त्यांना मिळतं. जीवनात अशी प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवण्याची इच्छा असते. मात्र अनेकदा या सर्व गोष्टी मिळवूनही अनेकदा ही व्यक्ती इतरांच्या चुकीमुळे या यशाचा आनंद घेऊ शकत नाही. 21 वर्षीय सर्बियन युट्यूबर क्रिस्टीना किका डुकिकच्या (Kristina 'Kika' Dukic) बाबतीतही असेच घडले. क्रिस्टीना तरुणी सोशल मीडिया स्टार (Social Media Star) होती, पण या स्टारडमने तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय संकट निर्माण केले होते हे कोणालाच माहित नव्हते.

क्रिस्टिना 'किका' डुकिकचा मृतदेह सर्बियन राजधानी बेलग्रेडमध्ये सापडला होता, त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या आत्महत्येमागे तिला फॉलो करणारे लोकच होते अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

क्रिस्टिनाचा मृतदेह 8 डिसेंबर रोजी बेलग्रेडमधील फ्लॅटमध्ये सापडला होता. आई नतासाने तिच्या मृत्यूची बातमी जगासमोर ठेवली. ज्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आहे, त्यांनी इतरांशी बोलावे, कारण त्यांच्या मुलीने तसे केले नव्हते, असेही त्या म्हणाल्या.

क्रिस्टीना ही सामान्य मुलगी नव्हती. तिला Instagram, YouTube आणि Twitch वर 10 लाख लोक फॉलो करत होते. तिला फॉलो करणाऱ्यांना तिच्या सौंदर्याचे आणि स्टाईलचे वेड लागले होते.

क्रिस्टीनाची मैत्रिण मीराने सांगितले की, तिला गेल्या 5 वर्षांपासून इंटरनेटवर लोकांच्या घृणास्पद वागणुकीचा, ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता. यूजर्सच्या अश्लील कमेंट्सना सामोरे जावे लागले आणि लोक निरर्थक बोलून तिला दुःखी करत होते. ती अनेकदा तिच्या यूट्यूब व्हिडीओंमध्ये याबद्दल बोलायची. त्यांनी सांगितले की लोक त्यांना द्वेषाने भरलेले मेसेज पाठवतात परंतु जीवनात स्वतःला आनंदी ठेवणे अधिक महत्वाचे आहे.

लोक तिला इंटरनेटवर फेक असल्याचा टॅग देत असत. सुंदर दिसण्यासाठी तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचे बहुतांश लोकांनी सांगितले, तर क्रिस्टीनाने नेहमीच त्याचा विरोध केला.

रिपब्लिका नावाच्या स्थानिक मीडियानुसार, क्रिस्टीना सर्बियन गेमर Bogdan Ilic च्या अनेक व्हिडीओंनंतर ट्रोल झाली, ज्याचा तिच्या मनावर खोल परिणाम झाला. मात्र, Bogdan Ilic ने म्हटलं की, क्रिस्टीना माझी मैत्रिण होती. क्रिस्टीनाच्या मृत्यूचे कारण सर्बियन गृह मंत्रालयाकडून तपासले जात आहे. तरीही सायबर बुलिंगमुळे 21 वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला, तर हे प्रकरण इंटरनेटचे धोकेही उघड करत आहे.

First published:
top videos

    Tags: Social media, Youtubers