नवी दिल्ली, 3 मार्च : Obsessive Stalker Hidden in Model’s House : एखादी व्यक्ती आवडणं चुकीचं नसतं. मात्र आपली आवड कोणावर तरी थोपवण्यासाठी चुकीचं वागणं मोठा गुन्हा आहे. एका 20 वर्षांच्या मुलाने असच काहीसं केलं आहे. हा मुलगी एका ब्रिटीश अॅडल्ट मॉडेलच्या मागे इतका वेडा झाला की, तिच्या घरापर्यंत पोहोचला. स्वत: मॉडेललाही याबाबत माहिती नव्हती.
तरुण फिलाडेल्फिया (Philadephia) येथील राहणारा आहे. त्याचं नाव मॉरिसो डैमियन गुरेरो (Mauricio Damian Guerrero) आहे. पोलिसांनी त्याला गेल्या महिन्यात न्यू हँपशायर (New Hampshire) मध्ये राहणाऱ्या अॅडल्ट मॉडेलच्या घराच्या छतावरुन अटक केलं. हा मुलगा अनेक दिवसांपासून मॉडेलच्या घरात लपून बसला होता. केवळ रात्री तिला झोपताना पाहायला आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी बाहेर येत होता.
मॉडेलच्या घराच्या नकली चाव्या तयार केल्या..
मॉरिसो डैमियन गुरेरोवर (Mauricio Damian Guerrero) आरोप आहे की, त्याने OnlyFans मॉडलच्या घराच्या खोट्या चाव्या तयार केल्या होत्या आणि हवं तेव्हा तिच्या घरी जात होता. मॉडेल झोपल्यानंतर तो खाली उतरून तिचा व्हिडीओ शूट करीत होता. पीडित मॉडेलला याबाबत काहीच माहिती नव्हती. मात्र कपाटातून आवाज येऊ लागल्यानंतर मॉडेलच्या आईला शंका आली. तपासादरम्यान खाण्याचे डबे, हेडफोन आणि यूरिन कप सापडले. गुरेरो छतावरुन पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केलं.
हे ही वाचा-पॉर्न पाहून अनैसर्गिक संबंधासाठी दबाव; प्रेग्नेन्सीदरम्यान पत्नीसोबत क्रूर कृत्य
वेड्याने सर्व सीमाच ओलांडल्या...
पीडित मॉडेलने पोलिसांना सांगितलं की, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुलाने तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. व्यक्तीने तिला टीव्ही सेट आणि फायरप्लेस गिफ्ट करण्यासाठी तिचा पत्ता मागितला. जेव्हा मॉडेने त्याला सांगितलं तर तो तिच्या घरापर्यंत पोहोचला. मॉडेलने यादरम्यान आपलं घर बदललं. मात्र त्याने तिच्या दुसऱ्या घराचा पत्ताही मिळवला. एके दिवशी मॉडेलला व्हिडीओ कॉल करून त्या माध्यमातून मॉडेलच्या आईच्या घराबाहेर असल्याचा दावा केला. यादरम्यान तिच्या घराची किल्ली हरवली होती. जी नंतर तिला सापडली. असं सांगण्यात आलं आहे की, या मुलानेच चाव्या चोरल्या होत्या आणि त्याची नकली कॉपी तयार केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Model