धक्कादायक वास्तव! जीवघेण्या कोरोनामुळे 803 जणांचं आयुष्य संपलं, सरकारचा निष्काळजीपणा भोवला

धक्कादायक वास्तव! जीवघेण्या कोरोनामुळे 803 जणांचं आयुष्य संपलं, सरकारचा निष्काळजीपणा भोवला

कोरोना व्हायरसच्या फैलावामागे कोण जबाबदार? सरकार की जनता ?

  • Share this:

बीजिंग, 9 फेब्रुवारी : चीन सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव वाढल्याची चर्चा सुरू आहे. जेव्हा वुहानमध्ये कोरोना व्हायरस पसरत होता, तेव्हा सरकारी पातळीवर एकमेकांवर जबाबदारी टाकली जात असल्याचे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. मात्र सरकारने व्हायरस पसरण्यामागे जनतेलाच जबाबदार धरलं आहे. नव्या आकड्यांनुसार जीवघेणा व्हायरसमुळे आतापर्य़ंत 803 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 37000 संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या आहे. चीन सरकार कोरोना व्हायरसला रोखण्यात अपयशी ठरले आहे. चीनमधील राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या कार्यकाळात नोकरशाही आणि तंत्रज्ञांच्या तुलनेत पक्षातील कार्यकर्त्यांना पसंती दिली आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींचा नोकरशाहीवर वर्चस्व आला आहे. सरकारवर टीका करणारे कोणतेही निर्णय घेण्यास नोकरशाह संकोच करतात. प्रसिद्ध चिनी लेखक आणि राजकारणी वॉचडॉग शू कैझन असा विश्वास करतात की, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यास सध्याची प्रशासकीय परिस्थिती जबाबदार आहे. वुहानमध्ये पसरलेल्या साथीच्या रोगाने स्थानिक सरकारची कमकुवत कारवाई उघडकीस आली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

रविवारी चीनच्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे मृतांची संख्या 803 वर पोहोचली आहे. ही संख्या 2002-2003 साली पसरलेल्या एसएआरएस (SARS) या विषाणूंच्या मृतांपेक्षा जास्त आहे. जागतिक पातळीवर ही संख्या सर्वाधिक मानली जात होती. तीव्र श्वसन सिंड्रोममुळे 2002-2003 साली 747 लोकांचा मृत्यू झाला होता. हुबेईच्या आरोग्य विभागानेही आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये मध्य प्रातांतील आणखी 2,177 नव्या प्रकरणांची पुष्टी केली आहे. आता संपूर्ण चीनमध्ये 36,690 हून अधिक पुष्टी केलेली प्रकरणे आहेत

First published: February 9, 2020, 8:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading