इस्लामाबाद, 12 एप्रिल : पाकिस्तानात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर इम्रान खान पायउतार झाले आहे. यानंतर आता पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) या पक्षाचे नेते शाहबाज शरीफ यांना पाकिस्तानचे पंतप्रधान बनवण्यात आले आहे. (Pakistan New PM Shahbaz Sharif) ते देशाचे 23 वे पंतप्रधान बनले आहेत. शाहबाज शरीफ यांना राष्ट्रपती आरिफ अल्वी हे शपथ देणार होते. मात्र, त्यांची तब्येत ठिक नसल्याचे त्यांनी सांगितले. अल्वी हे इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे सदस्य होते. त्यांची तब्येत ठिक नसल्यामुळे शाहबाज शरीफ यांना सिनेटचे चेअरमन सादिक संजरानी यांनी शपथ दिली.
पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 ला लाहोर येथे झाला. येथूनच त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. मोठे बंधू नवाझ शरीफ राजकारणात आल्यानंतर त्यांनीही राजकारणात पाऊल ठेवले. मात्र, शरीफ कुटुंबात नवाज, शाहबाज यांच्याशिवाय तिसरा भाऊ अब्बास देखील होता. ते पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य होते. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले.
शरीफ यांच्यासमोरच्या अडचणी -
पाकिस्तानवर दिवसेंदिवस कर्ज वाढत आहे. पाकिस्तानमध्ये खाणेपिणे महाग होत आहे. काही वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा परिस्थितीत, देशातील वाढती महागाई आणि कमकुवत अर्थव्यवस्थेतून देशाला बाहेर काढणे, याबरोबरच भारत आणि अमेरिकेतील संबंध सुधारणे हे मोठे आव्हान शरीफ यांच्यासमोर असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, Pakistan, Sharif