Home /News /videsh /

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचे व्हिडीओ होणार लीक; 3 तर अत्यंत आक्षेपार्ह

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांचे व्हिडीओ होणार लीक; 3 तर अत्यंत आक्षेपार्ह

दरम्यान काही महिन्यांपूर्वी टिकटॉक स्टार हरीम शाहचं (Hareem Shah) नाव चर्चेत होतं. इम्रान खान (Imran Khan) व्यतिरिक्त गृहमंत्री शेख रशीद आणि इतर अनेक नेत्यांसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.

    नवी दिल्ली, 5 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना गेल्या महिन्यात पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली होती. पंतप्रधान पद गेल्यानंतरही इम्रान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. लवकरच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे 7 व्हिडीओ प्रसिद्ध केले जातील किंवा लीक केले जातील, अशी माहिती समोर येत आहे. इम्रान यांच्या या सात व्हिडीओपैकी 3 अतिशय आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफची (पीटीआय) सोशल मीडिया विंग हे व्हिडीओ समोर येण्यापूर्वीच डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतल्याच कळतंय. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी स्वतःच ईदनंतर त्यांचं चारित्र्या हनन होऊ शकतं, असं म्हटलं होतं. इम्रानचे काही अत्यंत आक्षेपार्ह व्हिडीओ कधीही समोर येऊ शकतात, असे अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी स्पष्ट केले आहे. ज्येष्ठ पत्रकार जफर अब्बास नक्वी म्हणाले, हे व्हिडीओ रिलीज किंवा लीक होण्यासाठी तयार आहेत आणि इम्रान खान यांना याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांची सोशल मीडिया टीम आतापासून 'प्री डॅमेज कंट्रोल' मोडमध्ये आहे. पुढे नकवी म्हणाले, ‘अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे की, इम्रान यांचे 7 किंवा 8 व्हिडीओ आहेत आणि दोन ऑडिओ टेप्स आहेत. इम्रान यांचे सरकार पडल्यानंतर लगेचच हे व्हिडीओ प्रसिद्ध केले जाणार होते, परंतु त्यावेळी रमजानचा पवित्र महिना सुरू होता. त्यामुळे ते प्रसिद्ध केले गेले नाहीत. मात्र आता हे व्हिडीओ कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकतात.’ 'बिझनेस रेकॉर्डर'चे माजी पत्रकार रिजवान रझी यांच्या मते, ‘इम्रान खान यांचे काही व्हिडीओ बनिगाला या पंतप्रधानांच्या आलिशान घरात बनवले गेले आहेत. सर्वात मोठा व्हिडीओ 2 मिनिटे 18 सेकंदाचा आहे. महत्वाचं म्हणजे हे व्हिडीओ बनावट आहेत, असं इम्रान आणि त्यांचा पक्ष पीटीआयने म्हटलेलं नाही. त्यामुळे हे व्हिडीओ प्रसिद्ध होण्यापूर्वी त्याचे फॉरेन्सिक ऑडिट (Forensic Audit) करण्यात आल्याचं स्पष्ट आहे. हे व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडणार असून यापैकी एका व्हिडीओबद्दल तर बोलायलाही कीळसवाणं वाटतं. तर एक ऑडिओ इम्रान सरकारमध्ये गृहमंत्री राहिलेल्या शेख रशीद यांनी कारमध्ये रेकॉर्ड केला होता आणि नंतर तो लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना पाठवला होता,’ असं रझी म्हणाले. यासंदर्भात दैनिक भास्करने वृत्त दिलंय. इम्रान खान इस्लामाबादपासून 15 किमी अंतरावर असलेल्या बनिगाला येथे राहत होते. इम्रान दररोज बनिगाला ते ऑफिस हेलिकॉप्टरने प्रवास करायचे. हे ही वाचा-VIDEO: विमानतळावर कुटुंबाच्या सामानात सापडली भयंकर वस्तू; उडाली एकच खळबळ, धावू लागले लोक एका मीडिया रिपोर्टनुसार, इम्रानच्या 7 किंवा 8 व्हिडिओंपैकी 3 व्हिडिओ त्याच्या बनीगाला येथील घरात बनवले गेले आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ हा इम्रान यांचं सरकार पडणार होतं आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना बनवला गेलाय, असं जफर नक्वी यांनी इम्रान यांच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं. काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री एका महिलेला चार्टर फ्लाइटने अचानक लंडनला का पाठवण्यात आले, याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ पत्रकार इम्रान शफकत यांनी इम्रान यांच्या पक्षातील नेत्यांकडे मागितले आहे. या महिलेचे पीटीआयच्या अनेक मंत्र्यांशी संबंध असल्याचे बोललं जातंय. ही महिला गरोदर होती आणि तिचा गर्भपात लंडनमध्ये झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी टिकटॉक स्टार हरीम शाहचं (Hareem Shah) नाव चर्चेत होतं. इम्रान खान व्यतिरिक्त गृहमंत्री शेख रशीद आणि इतर अनेक नेत्यांसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते.
    First published:

    Tags: Imran khan, Pak pm Imran Khan, Pakistan

    पुढील बातम्या