किव, 25 फेब्रुवारी: रशियानं (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. आज रशियननं केलेल्या (Russian attack) हल्ल्याची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kyiv) सकाळपासून सात मोठे स्फोट ऐकू येत आहेत. शहरावर एकामागून एक क्षेपणास्त्रे हल्ले होत आहेत. लोक घरात लपून बसले आहेत. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. रशियन सैन्य पोहोचले राजधानी कीवमध्ये रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव येथे पोहोचले आहे. त्याचवेळी त्यांना थांबवण्यासाठी टेट्रिव नदीवरील पूल उडवण्यात आला आहे. रशियन रणगाडे घुसू नयेत यासाठी युक्रेनच्या लष्करानं हे पाऊल उचललं आहे. यासोबतच रशियानं दावा केला आहे की, त्यांच्या सैनिकांनी रशियाचे 2 रणगाडेही नष्ट केले आहेत. आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानं 13 सैनिकांना मारलं रशियन युद्धनौकेवरील सैनिकांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिल्यानं 13 युक्रेनियन सैनिकांची हत्या करण्यात आली आहे. प्रत्यक्षात युक्रेनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रशियन युद्धनौकेच्या बाजूनं असं म्हटलं जात आहे की, ‘मी सुचवतो की तुम्ही शस्त्रे खाली ठेवा आणि आत्मसमर्पण करा, अन्यथा तुमच्यावर हल्ला केला जाईल. यानंतर रशियन युद्धनौका नरकात जातील असे युक्रेनियन पोस्टवरून म्हटले आहे. यानंतर बेटावरील सर्व 13 सैनिक मारले जातात. हा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
रशियानं कीववर रॉकेट डागल्याचा युक्रेनचा दावा रशियानं कीववर रॉकेटनं हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा आहे. या हल्ल्याची माहिती देताना परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पुतिन यांना थांबवावे आणि रशियाला एकाकी पाडावं. ते म्हणाले की रशियाला सर्व ठिकाणांहून बाहेर फेकले पाहिजे. 800 रशियन सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या उपसंरक्षण मंत्री हन्ना मलयार यांनी 25 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजेपर्यंत शत्रूचं किती नुकसान झालं हे सांगितलं. मलयार यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेननं आतापर्यंत 7 विमान युनिट्स, 6 हेलिकॉप्टर युनिट्स, 30 हून अधिक टँक युनिट्स आणि रशियाच्या 130 बीबीएम युनिट्स नष्ट केल्या आहेत. याशिवाय 800 रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.