कीव, 27 फेब्रुवारी: रशिया- युक्रेन (Russia-Ukraine) युद्धामुळे सुमारे 16 हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. ज्यात बहुतांश विद्यार्थी आहेत. युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी भारतानं शनिवारी ऑपरेशन सुरू केलं. AI 1944 च्या पहिल्या विमानानं 219 लोकांना बुखारेस्टहून मुंबईत (Mumbai) आणलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या 250 भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी पहाटे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पोहोचलं. दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत तिसरे विमान बुडापेस्ट (हंगेरी) येथून 240 भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीला रवाना झालं आहे. युक्रेनच्या पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर शेकडो भारतीय अजूनही अडकले आहेत. एका भारतीय विद्यार्थ्यानं सांगितलं की, येथील तापमान -7 अंशांच्या जवळ आहे. मी काय करावं हे मला कळत नाही. अहवालानुसार युक्रेनमधील अनेक भारतीयांना युद्धादरम्यान शेल्टर, अन्न आणि पैशाची सुविधा नाही. त्यांचे मोबाईलही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ‘गार्ड्स भारतीयांना चेक पॉईंट पार करु देत नाहीत’ रिपोर्टनुसार, युक्रेनचे गार्ड्स भारतीयांना चेक पॉईंट पार करु देत नाहीत. सीमा ओलांडण्यासाठी गार्ड्सकडून विद्यार्थ्यांकडून लाच मागितल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. शुभम नावाच्या विद्यार्थ्यानं सांगितलं की, आम्ही सीमेवर अडकलो आहोत. आम्हाला येथे व्हिडिओ बनवण्यास मनाई आहे. आणखी एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, दूतावासाने जारी केलेल्या सल्ल्यानुसार आम्ही सर्वजण पोलंडच्या सीमेवर पोहोचलो आहोत. इथे आम्हाला थांबवलं आहे. आता आम्ही काय करू? ‘विद्यार्थी 9-10 किमी चालत पिकअप पॉईंटवर पोहोचलो’ एअर इंडियाच्या विशेष विमानानं विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या केबिन क्रू प्रभारी रजनी पॉल म्हणाल्या, भारतीयांना त्यांच्या घरी परत नेण्याच्या या ऑपरेशनचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. काही विद्यार्थी सामान घेऊन 9-10 किमी चालत पिकअप पॉइंटवर पोहोचले." बुखारेस्ट-बुडापेस्ट येथून भारतीयांना आणण्यासाठी विमानं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी 24 फेब्रुवारीच्या सकाळी प्रवासी विमानांच्या ऑपरेशनसाठी त्यांच्या देशाची हवाई हद्द बंद केली, त्यामुळे भारतीयांना घरी आणण्यासाठी बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथून ही विमानं चालवली जात आहेत. रशियाचा पुन्हा गोळीबार; 7 वर्षांच्या चिमुरडीचा नाहक बळी, हल्ल्यात 6 जण ठार अधिकार्यांनी सांगितलं की, युक्रेन-रोमानिया आणि युक्रेन-हंगेरी सीमेवर रस्त्यानं पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकारच्या अधिकार्यांच्या मदतीनं अनुक्रमे बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथे रस्त्यानं नेण्यात आलं. जेणेकरून त्यांना एअर इंडियाच्या विमानानं घरी आणता येईल. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी सरकार कोणतंही शुल्क आकारत नाही. ‘‘त्या भारतीयांना बाहेर काढणं कठीण होत आहे…’’ युक्रेनमधील भारतीय दूतावासानं सांगितलं की, जे भारतीय माहिती न देता सीमा चेक पोस्टवर पोहोचले आहे त्यांना बाहेर काढणं कठीण जात आहे. त्यात म्हटलं आहे की, पश्चिम युक्रेनमधील शहरांमध्ये राहणारे लोक तुलनेनं सुरक्षित वातावरणात राहतात आणि त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.