मुंबई : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचं सावट आलं आहे. तर या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरही होत असल्याचं दिसत आहे. पुन्हा एकदा रशियाने युक्रेवर हल्ला केला आहे. ड्रोन आणि मिसाईलने हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
जर्मनी आणि अमेरिकेने युक्रेनला डझनभर रणगाडे पाठवण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाने मिसाइल आणि ड्रोनने हल्ला केला. कीव भागातील घरांचे या हल्ल्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं. हल्ल्यानंतर 100 कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि जर्मनीने युक्रेनला रणगाडे देण्याची घोषणा केली. त्यानंतर हा हल्ला करण्यात आला. कीवने जर्मनी आणि अमेरिकेकडून रणगाडे खरेदी केल्याची घोषणा केल्याच्या लगेच हा हल्ला करण्यात आला. हे युद्धात पाश्चिमात्य देशांचा थेट सहभाग वाढण्याचे लक्षण असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात अमेरिका आणि युरोप जरी या युद्धात सहभागी नसले तरी अप्रत्यक्षपणे अमेरिका आणि युरोप हे दोन देश युक्रेनला मदत करून या युद्धाचा भाग होत असल्याचं रशियाने आरोप केला आहे. युक्रेनला रनगाडे पुरवल्यानंतर हे स्पष्ट होत असल्याचा आरोप रशियाने केला. त्यामुळे संतापलेल्या रशियाने युक्रेनवर पुन्हा एकदा मिसाइलने हल्ला केला. तर अमेरिका आणि युरोप हे दोन्ही देश आम्ही युद्धात अप्रत्यक्षपणेही सहभागी नाही असा दावा करत आहेत.
11 people killed in Russian missile strike in Ukraine, US condemns Read @ANI Story | https://t.co/AQAwknJcWP #RussianMissile #UkraineRussiaWar #US pic.twitter.com/vKlYzDlkxA
— ANI Digital (@ani_digital) January 26, 2023
दुसरीकडे रशिया युक्रेन युद्ध काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे. आधीच कोरोनाचं संकट, आर्थिक मंदीचं सावट, वाढती बेरोजगाई आणि दुपटीने वाढणारी महागाई या सगळ्याचा फटका इतर देशांना बसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Russia, Russia Ukraine