मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Big News : रमजानमध्ये दु:खद घटना! मक्काला जाणाऱ्या बसला भीषण आग, 20 होरपळले; VIDEO आला समोर

Big News : रमजानमध्ये दु:खद घटना! मक्काला जाणाऱ्या बसला भीषण आग, 20 होरपळले; VIDEO आला समोर

Ramdan Bus accident : मक्काला निघालेल्या 20 मुस्लीम यात्रेकरुंना काळानं गाठलं, रमजानमध्ये घडली दु:खद घटना

Ramdan Bus accident : मक्काला निघालेल्या 20 मुस्लीम यात्रेकरुंना काळानं गाठलं, रमजानमध्ये घडली दु:खद घटना

Ramdan Bus accident : मक्काला निघालेल्या 20 मुस्लीम यात्रेकरुंना काळानं गाठलं, रमजानमध्ये घडली दु:खद घटना

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली: जगभरात सध्या रमजान सण वेगवेगळ्या देशांमध्ये साजरा केला जात आहे. इस्लाम धर्मातील रमजान हा मोठा सण मानला जातो. या सणालाच मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रमजान निमित्तानं मक्काला निघालेल्या यात्रेकरुंच्या बसचा भयंकर अपघात झाला. या अपघातात बसला भीषण आग लागली आणि 20 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

इस्लामिक देशातील उमराहसाठी पवित्र शहर मक्का इथे यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला. हा अपघात ब्रेक फेल झाल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बस पुलावर आदळली आणि त्यानंतर भीषण आग लागली. या आगीत 20 यात्रेकरु होरपळले, तर ३० जण जखमी झाले आहेत.

रमजान महिन्यात लाखो मुस्लिम उमराहसाठी मक्का शहरात जाता. त्यामुळे सौदीतील रस्ते वर्दळीचे होऊन अनेक अपघात घडतात. यादरम्यान सौदी अरेबियातही ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

ही घटना रमजानच्या पहिल्या आठवड्यात घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुलावर आदळल्यानंतर आणि उलटल्यानंतर बसला आग लागली. यामध्ये बस पूर्णपणे जळालेली दिसत आहे. गाडीचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Ramdan 2023