S M L

रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी?

रघुराम राजन यांचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातोय, अशी बातमी लंडनच्या प्रतिष्ठित फायनान्शियन टाईम्सनं दिलीये.

Sonali Deshpande | Updated On: Apr 25, 2018 04:29 PM IST

रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदी?

23 एप्रिल : रघुराम राजन यांचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातोय, अशी बातमी लंडनच्या प्रतिष्ठित फायनान्शियन टाईम्सनं दिलीये. राजन यांची नियुक्ती होणारच, अशा अर्थाची ही बातमी नाहीये. बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कुणाला नियुक्त करायचं, याची प्रक्रिया ब्रिटनचे चान्सलर फिलीप हॅमंड लवकरच सुरू करणार आहेत.

राजन यांच्याबरोबरच श्रिती वडेरा, या ब्रिटनमधल्या राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ यांचंही नाव घेतलं जातंय.

राजन हे आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या 40 व्या वर्षी प्रमुख झाले. राजन यांनी २००५ मध्ये शोध निबंध सादर करून आर्थिक मंदीचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांचं म्हणणं हसण्यावारी नेण्यात आलं होतं. तीन वर्षांनतर रघुराम राजन यांची भविष्यवाणी खरी ठरली आणि अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत ओढली गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 12:29 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close