Princess of Persia Qajar : सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यात असतं असं म्हणतात; पण याचा प्रत्यय फार कमी वेळा येतो. आजच्या आधुनिक काळात स्त्रियांच्या सौंदर्याच्या व्याख्या खूपच विस्तारीत झाल्या आहेत. केवळ बाह्य सौंदर्यापुरत्या मर्यदित राहिलेल्या नाहीत. तरीही अगदी प्राचीन काळापासून समाजात स्त्री सौंदर्याचे (Beauty) काही मापदंड रूढ झाले आहेत. ते आजही कमी अधिक प्रमाणात कायम आहेत. मात्र प्राचीन काळात रूढार्थानं सुंदर नसलेली एक राजकुमारी तिच्या आगळ्या वेगळ्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध झाली होती. अनेकांना तिनं वेड लावलं होतं. ही राजकुमारी होती पर्शियाची अर्थात इराणची (Princess of Persia Qajar). कॅचन्यूज डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्रिन्सेस ऑफ कजार (Princess of Persia Qajar) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजकुमारीला चक्क मिशा (Mustach) होत्या. स्त्री असूनही मिशा असल्यानं तिच्याबद्दल सतत चर्चा होत असे; पण तिच्या या मिशांमुळेच अनेक लोक तिच्या प्रेमात पडले होते. एवढेच नव्हे तर तिनं नाकारल्यानं चक्क 13 जणांनी आत्महत्या (Suicide) केली होती. इराणच्या या राजकुमारीच्या सौंदर्याचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. या राजकुमारीवर पाश्चात्य संस्कृतीचा खूप प्रभाव होता त्यामुळे ती पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे घालायची. हिजाब (Hijab) काढून पाश्चिमात्य कपडे परिधान करणारी ती त्या काळातील पहिली महिला होती. हे ही वाचा- Yuck! चिनी लोक चक्क लघवीत उकडतात अंडी; आवडीने खातात Virgin egg डिश इराणची ही राजकुमारी, ताज अल-कजर सुल्ताना (Taj Al Qajar Sultana), सौंदर्याच्या कोणत्याही मापदंडात बसत नसतानाही अनेक तरुणांना आवडत असे. 19 व्या शतकात लठ्ठपणा ही सौंदर्याची पहिली पायरी मानली जात होती. त्याप्रमाणे ती लठ्ठ होतीच पण तिच्या चेहऱ्यावर जाड मिशा आणि जाड भुवया होत्या. मिशा असूनही अनेक तरुणांना ती खूप सुंदर वाटत असे. तिच्याशी लग्न करण्याची अनेक तरुणांची इच्छा ( There are many who want to marry her) होती, मात्र राजकुमारीचे आधीच अमीर हुसेन खान शोजा-ए-सुल्तानेहशी लग्न झाल्यानं तिनं सर्व तरुणांचे प्रस्ताव नाकारले. यामुळे दुखावलेल्या 13 तरुणांनी आत्महत्या केली होती. तसेच राजकुमारीचे अनेक लोकांशी संबंध होते. त्यांच्यामध्ये अली खान अजीजी अल-सुलतान आणि दुसरा इराणी कवी आरिफ काझविनी या दोन प्रमुख व्यक्ती होत्या. अशा राजेरजवाड्यांच्या अनेक कथा भारतात आणि जगभरात प्रसिद्ध आहेत. त्या आजही सगळ्यांच्या आठवणीत राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.