Home /News /videsh /

चिमट्याने नव्हे हातानेच उलटायची चपाती, पाहा VIDEO! प्रिन्स विल्यम आणि केट लाटतायत चपात्या

चिमट्याने नव्हे हातानेच उलटायची चपाती, पाहा VIDEO! प्रिन्स विल्यम आणि केट लाटतायत चपात्या

हा फेक VIDEO नाही. खरा आहे. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन (Prince William And Kate Middleton) यांनी मंगळवारी खरंच चपात्या लाटल्या. तव्यावर टाकलेली चपाती चिमट्याने उलटवणाऱ्या प्रिन्सला केटने सांगितलंसुद्धा की चपाती हातानेच उलटवायची आणि तिने ती उलटवलीही... काय आहे हा VIDEO? पाहा..

पुढे वाचा ...
लंडन, 26 मे: नवरा-बायको किचनमध्ये पोळ्या लाटतायत हे आपल्यासाठी तसं दुर्मीळ दृश्य राहिलेलं नाही. लॉकडाउनच्या काळात तर नाहीच. पण युवराज, तेही इंग्लंडचे हातात लाटणं घेऊन पोळ्या लाटताहेत असं दिसलं तर... पाहा VIDEO, आणि हो हा फेक VIDEO नाही. खरा आहे. प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन (Prince William And Kate Middleton) यांनी मंगळवारी खरंच चपात्या लाटल्या. तव्यावर टाकलेली चपाती चिमट्याने उलटवणाऱ्या प्रिन्सला केटने सांगितलंसुद्धा की चपाती हातानेच उलटवायची आणि तिने ती उलटवलीही... काय आहे हा VIDEO? प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांनी UK मधल्या एका कम्युनिटी किचनला (Community kitchan) भेट दिली. त्यांची ही भेट मोठा चर्चेचा विषय ठरली. स्कॉटलंड येथील शीख कुटुंबीयांच्या शीख संजोग (Sikh Sanjog)या धर्मादाय संस्थेला ड्युक आणि डचेस ऑफ केंब्रिज (Duke and Duchess of Cabrige) यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी या दोघांनी चपात्या केल्या आणि आमटी वाढण्याचं काम केलं.  एडिनबरामधील वंचित समुदायासाठी गरमागरम जेवण तयार करणाऱ्या या धर्मादाय संस्थेला हे इंग्लिश शाही जोडपे सक्रिय सहभागाच्या माध्यमातून पाठिंबा देत होते. स्कॉटलंड दौऱ्यावर असलेल्या प्रिन्स विल्यम आणि केट यांनी शीख संजोग या संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेतील महिलांनी एडिनबर्ग मधील राणीचे शाही निवासस्थान असलेल्या पॅलेस ऑफ होलीरुड हाऊसच्या (Palace OfHolyroodhouse)किचनमध्ये त्यांना चपात्या तयार करणं,पळीने आमटी वाढणं याबाबत मार्गदर्शन केलं. मुंबई-दुबई विमानातून एकट्याचा राजासारखा प्रवास; तिकिटाचा खर्च 18 हजार याबाबतचा व्हिडीओ युट्युबवर (Youtube) पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत हे दांपत्य गोलाकार चपात्या कशा तयार करायच्या हे शिकताना दिसत आहे. यावेळी आपला नवरा कणकेचा गोळा लाटण्याच्या सहाय्याने सपाट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून केट यांना हसू आवरता आलंनाही. ताजी कोथिंबीर, कढीपत्ता घालून तयार केलेली आमटी (Curry) आपल्याला खूप आवडते असं सांगत केट या घरी मला असंच जेवण आवडतं हे सांगत आहेत. आपल्या पत्नीला तिखट चवीचं जेवण फार आवडतं, याला प्रिन्स विल्यम दुजोरा देताना दिसत आहे. अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवर (Instagram) या शाही दांपत्याच्या या दौऱ्याचे काही फोटोज आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शीख संजोग संस्थेच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मार्व्हलला पडली हिंदू संस्कृतीची भुरळ; बिग बजेट सुपरहिरोपटात झळकणार भारतीय 1989 पासून ही संस्था महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांना कौशल्य,आत्मविश्वास आणि सामाजिक समावेशास प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत शीख संजोग संस्थेने समाजातील वंचित लोकांना आठवड्यातून 2 दिवस गरमागरम जेवण देण्याचा उपक्रम राबवल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. उत्तर भारतीय पध्दतीचे जेवण तयार कसे करायचे हे शिकण्याबरोबरच प्रिन्स विल्यम आणि केट यांनी यावेळी नवीन पुस्तकाचे मुखपृष्ठ डिझाइन करण्यासाठी स्पर्धेसाठी प्रवेशिका तयार करण्याकरिता शीख संजोग च्या युवा गटांपैकी एका गटात सहभाग घेतला. यावेळी भारतीय महिलांच्या गटाने पंजाबी लोकगीते गायली. त्यांच्या या सादरीकरणाचा ड्युक आणि डचेस यांनी आनंद घेतल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
First published:

Tags: England, Prince william

पुढील बातम्या