मराठी बातम्या /बातम्या /विदेश /VIDEO: जोरजोरात ओरडत महिलेनं रस्त्यावरच काढले सगळे कपडे; प्रिन्स फिलीप यांच्या शोकसभेत गोंधळ

VIDEO: जोरजोरात ओरडत महिलेनं रस्त्यावरच काढले सगळे कपडे; प्रिन्स फिलीप यांच्या शोकसभेत गोंधळ

ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स फिलीप (Prince Philip Funeral) यांच्या अंत्यसंस्कारावेळी एका महिलेने चांगलाचा गोंधळ घातला. महिलेने अचानक धावण्यास सुरुवात केली आणि रस्त्यावर आल्यानंतर तिने चक्क आपले सगळे कपडे काढण्यास सुरुवात केली

विंडसर, 18 एप्रिल : ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स फिलीप (Prince Philip Funeral) यांच्या अंत्यसंस्कारावेळी एका महिलेने चांगलाचा गोंधळ घातला. प्रिन्स फिलीप यांच्या शोकसभेच्या वेळी या महिलेने अचानक धावण्यास सुरुवात केली आणि रस्त्यावर आल्यानंतर तिने चक्क आपले सगळे कपडे काढण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे संपूर्ण कार्यक्रमात गोंधळ उडाला. विशेष म्हणजे ही महिला जोरात ओरडत होती आणि तिला रोखताना पोलिसांच्या चांगलेच नाकी नऊ आले.

शोकसभेत नग्न झाली महिला

प्रिन्स फिलीप (Prince Philip Funeral) यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अगोदर शोकसभा आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये बरेच लोक उपस्थित होते. त्याच शोकसभेत ही महिला देखील उपस्थित होती. शोकसभा चालू असताना अचानक ही महिला पळू लागली आणि जोरात ओरडू लागली. महिला अचानक ओरडली तेव्हा सुरुवातीला कोणालाही काही समजले नाही. ही महिला 'सेव्ह प्लॅनेट', सेव्ह प्लॅनेट असे म्हणून ओरडत होती. शोकसभेत उपस्थित असलेल्या लोकांसाठी ही अतिशय धक्कादायक घटना होती. कहर म्हणजे तिने रस्त्यावर धाव घेतली आणि तेथे पोचताच आपले सर्व कपडे काढले. ही महिला पूर्ण टॉपलेस झाली होती, त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी तिला ताबडतोब अटक केली आणि तिच्या अंगावर कापड टाकून तिचे अंग झाकून घेतले.

" isDesktop="true" id="541512" >

'सेव्ह प्लॅनेट' म्हणत ओरडत तिनं...

सेंट जॉर्ज चॅपलच्या आत शोकसभेची बैठक चालू होती आणि त्यावेळी एक मिनिटासाठी मौन बाळगण्यात आले होते, त्याचवेळी नेमकी ही महिला मोठ्याने ओरडू लागली. महिलेने मोठ्याने आरडाओरडा केला आणि राजवाड्याच्या गेटपासून रस्त्यावर पोहोचली. या प्रकारामुळे सर्व लोक आश्चर्यचकित झाले, तिला नेमकं काय झालंय हे कोणालाच कळेना. सुरक्षा दलाने महिलेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तिने तेथे उपस्थित राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्यावर उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. पोलिसांनी महिलेला पांढर्‍या कपड्यांनी झाकले आणि त्यानंतर तेथून तिला नेले. या महिलेच्या डोळ्यावर काळा चष्मा होता आणि तिने टोपीही घातली होती. महिलेची आरडा-ओरड पाहून लोकांची गर्दी तिच्या भोवती जमली होती.

First published:
top videos

    Tags: England, Prince phillip