कोरोना व्हायरसवर अजुनही औषध मिळालेलं नाही. त्यावर संशोधन सुरु आहे. मात्र कोरोना व्हायरस पसरण्याचं एक नवं कारण समोर आलं आहे.
हवेत असलेल्या प्रदुषणामुळेही कोरोना वेगाने पसरतो असं तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे. काही हॉस्पिटल्समधल्या रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर हे तथ्य आढळून आलं आहे.
प्रदुषण वाढलं की हवेत घातक कण पसरतात. त्याचा परिणाम थेट फुफुस्सांवर होतो. त्यामुळे प्रतिकार शक्ती खालावते असं आढळून आलं आहे.
प्रतिकार शक्ती कमी झाली की कोरोना व्हायरस जोमाने हल्ला करतात. त्यामुळे प्रदुषित हवेपासून सगळ्यांनीच दूर राहिलं पाहिजे असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
स्वच्छ आणि मोकळ्या हवेत हा व्हायरस फार काळ राहात नाही. त्यामुळे बैठका या बंद खोलीत न करता मोकळ्या जागेत कराव्या असा सल्लाही दिला जातो.
हवा जेवढी स्वच्छ असेल तेवढा ऑक्सिजन जास्त मिळतो. ऑक्सिजन जास्त मिळाल्यामुळे प्रतिकार शक्तीवाढते आणि व्हायरसचा धोका कमी होतो असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.