लाहोर, 05 मार्च : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक ए इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यांना अटक करण्यासाठी इम्लामाबाद पोलिस लाहोरमध्ये त्यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. अदियाला तुरुंगात इम्रान खान यांना ठेवण्यासाठी एक खास सेल तयार करण्यात येत असल्याचंही म्हटलं जात आहे. पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
इस्लामाबाद पोलिसांनी ट्विटरवर म्हटलं की, न्यायालयाच्या आदेशानुसार इस्लामाबाद पोलिसांचे एक पथक इम्रान खान यांना अटक करण्यासाठी लाहोरला पोहोचलं आहे. लाहोर पोलिसांच्या सहकार्याने सर्व ऑपरेशन पूर्ण केलं जात आहे. न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करण्यात अडथळा आणतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. इस्लामाबाद पोलिस त्यांच्या सुरक्षेत इम्रान खान यांना इस्लामाबादला आणेल. कायदा सर्वांसाठी समान आहे.
दरम्यान, इम्रान खान यांच्या अटकेआधी पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलं की, इम्रान खान यांना अटक करण्याच्या प्रयत्नामुळे स्थिती आणखी बिघडेल. मी या सक्षम नसलेल्या आणि पाकिस्तान विरोधी सरकारला इशारा देतो की पाकिस्तानला आणखी संकटात टाकू नका. समजुतदारपणे परिस्थिती हाताळा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, Islamabad united, Lahore, Pakistan