• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • दाम्पत्यामधील वाद सोडवण्यासाठी पोलीस पोहोचले घरी; 6 मुलांची अवस्था पाहून अधिकारी चक्रावलेच!

दाम्पत्यामधील वाद सोडवण्यासाठी पोलीस पोहोचले घरी; 6 मुलांची अवस्था पाहून अधिकारी चक्रावलेच!

तातडीने पोलिसांनी त्या सहा मुलांना घराच्या बाहेर काढलं.

 • Share this:
  इंग्लंड, 20 सप्टेंबर : इंग्लंड (England News) मधून एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे 6 मुलांना घराच्या बाहेर आणण्यात आलं आहे. ज्या अवस्थेत या मुलांना बाहेर काढलं (6 Kids evacuated from dirty house) ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. घराच्या आता कुजलेला कचरा, कुत्रा आणि उंदराची विष्ठा आणि अत्यंत घाणेरडं टॉयलेट (Dirty toilet) होतं. सोशल मीडियावर या घराता फोटो (England dirty home photo) पाहून लोक हैराण झाले आहेत. अशा ठिकाणी कोणी कसं राहू शकतं, असा सवाल केला जात आहे. मुलांची अवस्था पाहून त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई सुरू आहे. लिवरपूल क्राउन कोर्टात (Liverpool Crown Court) जारी सुनावणीदरम्यान पब्लिक प्रॉसिक्यूटरनी सांगितलं की, एकेदिवशी मुलांच्या आई-वडिलांमध्ये खूप वाद झाला. ज्यानंतर पोलिसांना बोलवावं लागलं. पोलीस घरात घुसताच दुर्गंधीमुळे श्वास गुदमरू लागला. पोलिसांनी सांगितलं की, घरभर कचरा सांडला होता. कुत्र्याची विष्ठा ठिकाठिकाणी पडली होती. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात उंदीर फिरत होते. या दाम्पत्याने कचऱ्यामध्ये आपल्या सहा मुलांना सोडून दिलं होतं. पोलिसांनी सांगितलं की बाथरूमदेखील बऱ्याच काळापासून स्वच्छ केलं नसल्याचं दिसत होते.  (Police arrived home to settle the couples dispute Seeing the condition of 6 children officer shocked) हे ही वाचा-मालकीणीवरील अत्याचाराचा पोपट ठरला साक्षीदार; कोर्टाला सांगितला घडलेला प्रकार मुलांची अवस्था पाहताच पोलिसांनी तातडीने दुसऱ्या अधिकाऱ्याला फोन केला व मुलांना घराच्या बाहेर आणलं. त्यांना स्वच्छ कपडे, जेवू घातलं. पोलिसांनी दाम्पत्याला अटक करीत चौकशी सुरू केली आहे. याबाबत मुलांच्या वडिलांनी सांगितलं की, एक महिन्यापूर्वीच मी घर साफ केलं होतं. घरातील अस्वच्छतेत राहणं मुलांना शक्य होत नाही, तर दुसरीकडे त्यांच्या आईने सांगितलं की, ती कामासाठी बराच काळ बाहेर असते. त्यामुळे घराकडे लक्ष देऊ शकत नाही. त्याशिवाय ते बाहेरूनच जेवण मागवतात त्यामुळे घरात जास्त कचरा जमा झाला आहे. त्यांच्या सहा मुलांपैकी एकाने सांगितलं की, त्यांचं घर राहण्या लायक नाही.

  Published by:Meenal Gangurde
  First published: