मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चीनची टरकली; बिथरलेल्या ड्रॅगनने सुरू केल्या भेटीगाठी

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चीनची टरकली; बिथरलेल्या ड्रॅगनने सुरू केल्या भेटीगाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा दौरा केला होता. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याने चीनला चांगलीच धडकी भरल्याचं दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा दौरा केला होता. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याने चीनला चांगलीच धडकी भरल्याचं दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच बांगलादेशचा दौरा केला होता. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याने चीनला चांगलीच धडकी भरल्याचं दिसत आहे.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल: बांगलादेश (Bangladesh) स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बांगलादेशचा दौरा (Bangladesh tour) करुन या कार्यक्रमात प्रमुख अतिती म्हणून उपस्थिती लावली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याने चीनला चांगलीच धडकी भरल्याचं दिसत आहे. कारण, मोदींनी केलेल्या या दौऱ्यानंतर घाबरलेल्या चीन (China)ने नवी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेशला शस्त्रे देऊन आपले स्ट्रॅटेजिक संबंध दृढ करण्याचा चीनने प्रयत्न सुरू केला असल्याचं वृत्त समोर येत आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील आर्थिक संबंधांचा चीनला पूर्वीपासूनच अडचणी होत्या. भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध आपल्यासाठी अडचण निर्माण करु नयेत यासाठी चीनने तडकाफडकी चीनमधील शस्त्रे बनवणाऱ्या सरकारी कंपनी नोरिंकोच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापक वांग हेंग यांना 11 एप्रिल रोजी एका शिष्टमंडळासह बांगलादेशच्या दौऱ्यावर पाठवलं. जेणेकरुन बांगलादेशचा आपल्याला कुठल्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. ढाका कँटमध्ये या शिष्टमंडळाने बांगलादेशच्या तोफखाना संचालकांच्या संचालकांची भेट घेतली आणि त्यांना आधुनिक तोफा, तसेच नव्याने विकसित करण्यात आलेल्या शस्रांबाबत चर्चा केली. तसेच भविष्यातील सहकार्यासाठी सुद्धा एक दीर्घ बैठक घेतली. वाचा: सलग 6वेळा राष्ट्रपतीपदी निवड होत रचला इतिहास मात्र, विजयाच्या दुसऱ्याच दिवशी बंडखोरांनी केली हत्या गुप्त रिपोर्ट्सनुसार, 41 तज्ञांची एक दुसरी टीम येत्या तीन महिन्यांत बांगलादेशचा दौरा करणार आहे. ही टीम टी-59 च्या अपग्रेडेशनसाठी बांगलादेशमध्ये जाणार आहे. चीन बांगलादेशमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे भारताला माहिती आहे. यामुळेच यावर्षी भारतीय वायूसेनेचे प्रमुख आरकेएस भदोरिया आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी बांगलादेशचा दौरा केला होता. रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये चीन आणि बांगलादेश यांच्यातील संबंध भागीदारीत बदलले होते. दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 27 करार झाले होते आणि चीनकडून बेल्ट रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) अंतर्गत जवळपास 38 अरब डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती. आकडेवारीवर नजर टाकल्यास दक्षिण आशियात बांगलादेश हा चीनची मोठी गुंतवणूक मिळवणारा पाकिस्ताननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीन आपल्या कर्ज पुरवठ्याच्या धोरणाखाली अनेक लहान आणि गरजू देशांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: China, Narendra modi

    पुढील बातम्या