मराठी बातम्या /बातम्या /विदेश /I am Sorry! अखेर ‘त्या’ वादग्रस्त दारु पार्टीसाठी पंतप्रधानांनी मागितली माफी

I am Sorry! अखेर ‘त्या’ वादग्रस्त दारु पार्टीसाठी पंतप्रधानांनी मागितली माफी

लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण ब्रिटन नियमांचं पालन करत असताना आपण दारू पार्टी आयोजित करणं चुकीचं होतं, असं म्हणत पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली आहे.

लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण ब्रिटन नियमांचं पालन करत असताना आपण दारू पार्टी आयोजित करणं चुकीचं होतं, असं म्हणत पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली आहे.

लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण ब्रिटन नियमांचं पालन करत असताना आपण दारू पार्टी आयोजित करणं चुकीचं होतं, असं म्हणत पंतप्रधानांनी जाहीर माफी मागितली आहे.

ब्रिटन, 12 जानेवारी: पहिल्या कोरोना लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) काळात ब्रिटनमध्ये (Britain) आयोजित करण्यात आलेल्या वादग्रस्त दारु पार्टीसाठी (Controversial booze party) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) यांनी माफी (Apology) मागितली आहे. कोरोना काळात इतर सर्वजण लॉकडाऊनमध्ये असताना ब्रिटीश पंतप्रधानांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी शहरातील अनेक मान्यवरांना बोलावण्यात आलं होतं. या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी हा मुद्दा लावून धरत जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

जॉन्सन यांनी मागितली माफी

या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलेलं असताना स्वतः पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांचं कार्यालय काहीही बोलत नव्हतं. हा मुद्दा तापत चालल्याचं पाहून अखेर पंतप्रधानांनी आपलं मौन सोडलं असून मनापासून जनतेची माफी मागत असल्याचं म्हटलं आहे. लाखो ब्रिटीश नागरिक कोरोना निर्बंधांचं पालन करत असताना आपण पार्टी करणं योग्य ठरेल का, या गोष्टीचा विचार आपण करायला हवा होता, असं त्यांनी म्हटलं आहे. 

काय आहे प्रकरण?

2019 साली ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून झालेल्या निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांना घवघवीत यश मिळालं होतं. त्यानंतर काही महिन्यात जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आणि जगभरातील इतर देशांप्रमाणेच ब्रिटननेदेखील लॉकडाऊन जाहीर केला. याच काळात लंडनमधील एका बागेत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील अनेक मान्यवरांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या पार्टीत कोरोनासंबंधीच्या अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं. 

हे वाचा -

पार्टी कशासाठी?

20 मे 2020 या दिवशी डाउनिंग स्ट्रिटवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आपलं राजकीय वर्चस्व आणि हितंसंबध जोपासण्यासाठी नियम ओलांडून या पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप विरोधी मजूर पक्षानं केला आहे. या पार्टीचं निमंत्रण जॉन्सन यांच्या खासगी सचिवांनी ईमेलवरून पाठवलं होतं. त्यात सहभागी होण्यासाठी सर्वांना विनंती करण्यात आली होती आणि प्रत्येकाने येताना आपापलं मद्य घेऊन यावं, असंही सांगण्यात आलं होतं.

या मुद्द्यावरून सुरू असलेला गदारोळ माफी मागितल्यानंतर संपणार का, हे लवकरच कळेल.  

First published:

Tags: Britain, Party night, Prime minister