जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / फिलिपीन्समध्ये मोठी दुर्घटना; 85 जण प्रवास करणारं सैन्याचं विमान कोसळलं, 15 जणांची सुखरुप सुटका

फिलिपीन्समध्ये मोठी दुर्घटना; 85 जण प्रवास करणारं सैन्याचं विमान कोसळलं, 15 जणांची सुखरुप सुटका

फिलिपीन्समध्ये मोठी दुर्घटना; 85 जण प्रवास करणारं सैन्याचं विमान कोसळलं, 15 जणांची सुखरुप सुटका

Military Plane Crashed: सैन्य दलाचं विमान कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातावेळी विमानात 85 जण प्रवास करत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

फिलिपीन्स, 04 जुलै: फिलिपिन्समध्ये (Southern Philippines) मोठा अपघात झाल्याचं वृत्त समोर येत आहे. एक सैन्याचं विमान (military plane) कोसळल्याची (Crashed) माहिती मिळाली आहे. अपघात झाला त्यावेळी विमानात 85 जण होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. फिलिपीन्सचे सैन्य प्रमुख सिरिलिटो सोबेजाना (General Cirilito Sobejana) यांनी सांगितले की, हा अपघात दक्षिणी फिलिपिन्समध्ये झाला. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत 15 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी हे विमान सुलू राज्यातील जोलो बेटवर उतरण्याचा प्रयत्न करत होते.

जाहिरात

मदत व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात कमी लोकांचा नुकसान झालं पाहिजे अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत. त्यापैकी बहुतेकांनी नुकतीच बेसिक लष्करी प्रशिक्षण घेतले होते, असं सिरिलिटो सोबेजाना म्हणाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात