दिल्ली, 10 जून: पाकिस्तानचे एकेकाळी सर्वेसर्वा असलेले त्या देशाचे लष्करशहा आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्ऱफ (Parvez Musharraf no more) यांचं निधन झालं. पाकिस्तानी माध्यमातून त्यांच्या मृत्यूचं वृत्त जाहीर करण्यात आलं आहे. गेला अनेक काळ ते आजारी होते आणि अंथरुणाला खिळून होते. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तचा (Sanjay Dutt with Parvez musharraf) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो परवेझ मुशर्रफ यांना भेटताना दिसला होता. त्याच वेळी मुशर्रफ यांची तब्येत ठीक नसल्याचं समोर आलं होतं. ते व्हील चेअरवर होते. दोघांची ही भेट दुबईत झाली. या फोटोवर भारतात काहींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्यांची सहज भेट होती, असं सांगितलं जातं. बऱ्याच काळापासून पाकचे माजी लष्करशहा परवेज यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडियानुसार, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. शेवटी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 2016 मध्ये उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (Pakistan) संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. तिथल्या स्टार्ससोबत काम करण्याविषयी कडक निर्बंध लागू झाले. दोन्ही देशांमधील हा तणाव आजही कायम आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खलनायक म्हणजेच संजय दत्त पाकच्या माजी लष्करशहांना भेटल्याने खळबळ उडाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.