Home /News /videsh /

Pakistan Political Crisis: पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर इम्रान खान यांचं पहिलं Tweet

Pakistan Political Crisis: पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर इम्रान खान यांचं पहिलं Tweet

Pakistan Political Crisis: पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलं आहे.

    इस्लामाबाद, 11 एप्रिल: पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांना सत्तेतून बाहेर पडावं लागलं आहे. पाकिस्तानी संसदेत (Pakistani parliament) इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात (no-confidence motion) त्यांच्या सरकारचा पराभव झाला. पंतप्रधानपद सोडल्यानंतर इम्रान खान यांनी पहिलं ट्विट (Tweet) केलं आहे. इम्रान खान यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, पाकिस्तान 1947 मध्ये स्वतंत्र देश झाला. मात्र सत्ता बदलण्याच्या परकीय षड्यंत्राच्या विरोधात आज स्वातंत्र्य लढा पुन्हा सुरू झाला आहे. देशातील जनता नेहमीच त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि लोकशाहीचे रक्षण करते. इम्रान खानविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आणि इस्लामाबादमधून बाहेर पडल्यानंतरचे त्यांचे हे पहिलंच ट्विट आहे. आज इम्रानचा पक्षानं इस्लामाबादमध्ये रात्री 9:30 वाजता पाकिस्तान तारिक के इंसाफमध्ये आंदोलन केलं. इम्रान यांच्या पक्षाच्या बैठकीत आंदोलनाबाबत निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावाच्या एक दिवस आधी देशाला संबोधित करताना रविवारी जनतेला रस्त्यावर उतरून निषेधाचे आवाहन केलं. या आंदोलनाचा व्हिडिओ इम्रान खान यांनी शेअर केला आहे. राजकीय गदारोळात पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इम्रान खान यांनी इस्लामाबाद सोडलं. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा नॅशनल असेंबलीतील अविश्वास प्रस्तावावरील मतदानात पराभव झाला आहे. त्यानंतर त्यांनी इस्लामाबादमधील पंतप्रधान निवासस्थान सोडल्यानंतर हेलिकॉप्टरने इस्लामाबादला रवाना झाले. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खानने 1992 मध्ये आपल्या कमकुवत संघाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यात यश मिळवलं होतं. मात्र सत्तेच्या खेळपट्टीवर त्याचा करिष्मा पुन्हा दाखवण्यात ते अपयशी ठरले. खरे तर, संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीमधील विरोधकांनी पंतप्रधानांच्या पहिल्या डावाच्या मध्यावरच त्यांना बाहेर काढलं. शनिवारी रात्री उशिरा नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी त्यांचे मित्रपक्ष आणि त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी त्यांची साथ सोडून दिली होती. खान यांच्याविरोधात विरोधकांनी संसदेत अविश्वास ठराव मांडला होता. 3 एप्रिल रोजी नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकरने अविश्वास प्रस्ताव नाकारला होता, त्यानंतर खान यांनी खालचे सभागृह विसर्जित करून राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस केली, जी राष्ट्रपतींनी स्वीकारली. 8 मार्च रोजी पंतप्रधान इम्रान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 342 सदस्य आहेत, ज्यामध्ये 172 बहुमत आहे. पीटीआयच्या नेतृत्वाखालील युती 179 सदस्यांच्या पाठिंब्याने तयार झाली होती, ज्यामध्ये इम्रान खान यांच्या पीटीआयचे 155 सदस्य होते. पीटीआयने आपला प्रमुख सहयोगी मुत्ताहिदा क्वामी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) गमावल्यानंतर आणि विरोधी पक्षाने 8 मार्च रोजी पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर इम्रान खानला मोठा धक्का बसला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Imran khan, Pak pm Imran Khan

    पुढील बातम्या