मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Pakistan Latest News: पाकिस्तानात इम्रान खान हजारो समर्थक रस्त्यावर, 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देत निदर्शने

Pakistan Latest News: पाकिस्तानात इम्रान खान हजारो समर्थक रस्त्यावर, 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देत निदर्शने

पाकिस्तानातील (Pakistan)  राजकीय परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. आज सोमवारी शेजारील देशात नवा पंतप्रधान (new prime minister) निवडला जाणार आहे.

पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. आज सोमवारी शेजारील देशात नवा पंतप्रधान (new prime minister) निवडला जाणार आहे.

पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. आज सोमवारी शेजारील देशात नवा पंतप्रधान (new prime minister) निवडला जाणार आहे.

इस्लामाबाद, 11 एप्रिल: पाकिस्तानातील (Pakistan) राजकीय परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. आज सोमवारी शेजारील देशात नवा पंतप्रधान (new prime minister) निवडला जाणार आहे. मात्र त्याआधीच इम्रान समर्थकांची रस्त्यावर गर्दी झाली आहे. इम्रान खान (Imran Khan) यांना पुन्हा पंतप्रधान करावे, या मागणीसाठी इम्रानचे लाखो समर्थक कराचीपासून लाहोरपर्यंत निदर्शने करत आहेत. अशाच एका रॅलीत 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देण्यात आल्या.

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे शेख रशीद रविवारी रावळपिंडीत एका सभेला संबोधित करत होते. त्यात 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देण्यात आल्या. लष्कराच्या विरोधात या घोषणा दिल्या जात आहेत.

इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यामागे पाकिस्तानचे लष्कर आणि लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचा हात असल्याचं मानलं जात आहे. मात्र, भाषणादरम्यान काही वेळानं शेख रशीद यांनी जनतेला अशा घोषणा न करण्याचे आवाहन केलं, त्यानंतर जनता शांत झाली.

इम्रानचे लाखो समर्थक रस्त्यावर

पाकिस्तानातील जनतेचा एक मोठा वर्ग आहे ज्याला इम्रान खान यांना पंतप्रधान म्हणून पाहायचं आहे. सध्या इम्रान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) ची पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. सध्या इस्लामाबाद, कराची, पेशावर, मलाकंद, मुलतान, खैबर, झांग आणि क्वेटा येथे विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

इम्रान यांनीही समर्थकांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, हा एक ऐतिहासिक जमाव आहे, जो 'बदमाशांच्या' नेतृत्वाखालील आयात सरकारला विरोध करत आहे.

इम्रान खान यांचे समर्थक जेलभरो आंदोलन सुरू करणार

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माजी गृहमंत्री शेख रशीद आंदोलकांना देशाच्या लष्कराविरोधात घोषणाबाजी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. घोषणाबाजी करू नका... आम्ही शांततेने लढू, असे ते म्हणाले. देशाला वाचवायचे असेल तर रात्रीच्या अंधारात नाही तर दिवसाच्या उजेडात निर्णय घ्या, असे शेख रशीद म्हणाले. 29/4 रोजी ईद आहे. तयार राहा, आम्ही रोज लाल हवेलीतून जेल भरो आंदोलन करू. मी स्वत: कराचीतून आंदोलनाचा भाग होणार आहे. ते सर्व सिंधी लोकांना सांगेन की ते (तत्कालीन विरोधक) चोर, फसवणूक करणारे आणि दरोडेखोर आहेत.

इम्रानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी आणि झेंडे फडकावले

कराचीत इम्रान खान यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शहर उजळून निघालं होतं. इस्लामाबादमधील झिरो पॉईंटपासून निदर्शने सुरू झाली, पीटीआय समर्थकांनी एकत्र येऊन माजी पंतप्रधानांच्या बाजूने झेंडे फडकावले. वृत्तानुसार, रॅलीमुळे श्रीनगर महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. पीटीआयचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी आदल्या दिवशी इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना ईशाच्या नमाजानंतर लोकांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

First published:
top videos

    Tags: Imran khan, Pak defence minister, Pakistan, Pakistan army