कराची : सध्या पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट आहे. तिथली आर्थिक स्थिती बिकट असताना आता कराची इथल्या पोलीस मुख्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून 19 जण जखमी आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी शुक्रवारी पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं आणि इमारत पुन्हा ताब्यात घेतली. सध्या ही इमारत पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे. एकूण तीन हल्लेखोर टोयोटा कोरोला कारमधून केपीओमध्ये पोहोचले. एका हल्लेखोराने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्वत:ला उडवले तर इतर दोन दहशतवाद्यांना पोलिसांवर हल्ला केला. कराची पोलिसांच्या प्रवक्त्यानेही दहशतवाद्यांना ठार केल्याचंही सांगितलं.
अरेरे! पाकिस्तानची दुरावस्था, 780 किलो चिकन तर 210 रुपये दूधहे एक मोठं ऑपरेशन होते ज्यामध्ये दक्षिण आणि पूर्वेकडील डीआयजींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी रेंजर्स आणि लष्करासह सहभागी झाले होते. त्यांना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. त्यांनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातही दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन केलं होतं. दहशतवादी पूर्ण तयारीने आले होते. त्यांच्याकडे शस्त्रसाठा आणि हातगोळे देखील होते. पोलिसांनी संपूर्ण फौज बोलवूनही तीन दहशतवाद्यांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिल्याचंही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. १९ जणांवर सध्या उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.