जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / Breaking : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक; राजकारणात मोठी खळबळ

Breaking : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक; राजकारणात मोठी खळबळ

imran khan

imran khan

नवी दिल्ली, 9 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक झाल्याचं सांगितलं जात आहे. इस्लामाबाद हायकोर्टात हजर होण्यासाठी आलेले असताना खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली आहे. इम्रान खान 2 प्रकरणात जामिनासाठी हायकोर्टात गेले होते. Former Pakistan PM & PTI chief Imran Khan has been arrested from outside the Islamabad High Court (IHC) by Rangers, reports Pakistan's Dawn News pic.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 9 मे : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली इम्रान खान यांना अटक झाल्याचं सांगितलं जात आहे. इस्लामाबाद हायकोर्टात हजर होण्यासाठी आलेले असताना खान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानी रेंजर्सने अटक केली आहे. इम्रान खान 2 प्रकरणात जामिनासाठी हायकोर्टात गेले होते.

    जाहिरात

    पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. मंगलवारी इस्‍लामाबादच्या उच्च न्यायालयात बायो‍मेट्रिक वेरीफिकेशनसाठी जाताना त्यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्‍तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआई) चे नेता मुसर्रत चीमांनी जावा केला आहे की, इम्रान यांना टॉर्चर केलं जात आहे. पार्टीकडून त्यांना जखमी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. सैन्यावर गंभीर आरोप लावणारी लाहोर रॅलीनंतर इम्रान यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान यांनी आपल्या रॅलीत माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि विदेश मंत्री बिलावल भुट्टोवर निशाणा साधला होता. अटकेनंतर एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इम्रान यांचा पक्ष तहरीक-ए-इंसाफ (PTI) ने आरोप केला आहे की, इम्रानला मारहाण करण्यात आली. पक्षाने इम्रानच्या वकिलांचा रक्ताळलेल्या अवस्थेतून व्हिडीओ पोस्ट करण्यात आली आहे. बातमी अपडेट होत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात