कराची : नमाज सुरू असताना भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ३५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नमाज सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या पेशावर इथे हा भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत खराब होत आहे. आर्थिक संकट ओढवलं असताना पेशावरमध्ये नमाज सुरू असताना स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस लाइन परिसरातील एका मशिदीजवळ सोमवारी बॉम्बस्फोट झाला. याची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लीक करा आत्मघातकी हल्ला घडवून आणल्याची ही चर्चा होत आहे. या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. हल्ल्यानंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं जात असल्याची माहिती मिळाली आहे. बातमी अपडेट होत आहे.