मराठी बातम्या /बातम्या /विदेश /ओमिक्रॉनचा विळखा! अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये लहान मुलांचे प्रमाण चौपट; अर्ध्याहून अधिक रुग्ण पाच वर्षांखालील

ओमिक्रॉनचा विळखा! अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये लहान मुलांचे प्रमाण चौपट; अर्ध्याहून अधिक रुग्ण पाच वर्षांखालील

Omicron Variant america

Omicron Variant america

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोविड-19 (Covid-19) विषाणूचा व्हेरियंट ओमिक्रॉन (Omicron Variant) हा आता जगभरात मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

  नवी दिल्ली, 27  डिसेंबर: दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोविड-19 (Covid-19) विषाणूचा व्हेरियंट ओमिक्रॉन (Omicron Variant) हा आता जगभरात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. प्रौढांसाठी हा व्हेरियंट तितका घातक नसला, तरी लहान मुलांसाठी हा नक्कीच धोकादायक (Omicron dangerous to kids) असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेत 18 वर्षांखालील मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचं प्रमाण (New York children hospitalised) हे या महिन्यात तब्बल चार पटींनी वाढल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

  न्यूयॉर्कच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी एक स्टेटमेंट जारी केलं. “शहरातील लहान मुलांच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. पाच डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात, आणि आताच्या आठवड्यात 18 वर्षांखालील रुग्णांमध्ये चौपट वाढ (Fourfold increase in hospitalised children) दिसून आली आहे. यातील सुमारे 50 टक्के रुग्ण हे पाच वर्षांच्या आतील (Younger than 5 year old) आहेत. या वयोगटातील मुलांना अद्याप कोरोना लस दिली जात नाही” असे या स्टेटमेंटमध्ये म्हटले होते. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

  ओमिक्रॉन भलताच संसर्गजन्य

  रविवारी माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार, अँथनी फाउची (Anthony Fauci) यांनी ओमिक्रॉन हा व्हेरियंट भलताच संसर्गजन्य (Extraordinarily Contagious) असल्याचे मान्य केले. यादृष्टीने प्रशासनाकडून तातडीने पावलं उचलली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ओमिक्रॉनमुळे रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे, तसेच कित्येक विमान कर्मचाऱ्यांना याची लागण झाल्यामुळे शेकडो विमान उड्डाणं रद्द (America flights cancelled amid Omicron) करण्यात आली आहेत. “आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनानुसार, ओमिक्रॉन हा डेल्टा एवढा धोकादायक नाही. ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची अगदी कमी गरज भासते. तसंच, रुग्णालयात भरती केल्यानंतरही अधिक काळ तिथं राहण्याची, वा ऑक्सिजन लावण्याची गरज अगदीच कमी आहे. मात्र, ज्या प्रमाणात हा व्हेरियंट पसरतो आहे, ते पाहिल्यास त्याचा धोका वाढू (Omicron can be severe) शकतो.” असे फाउची यांनी सांगितले.

  अमेरिकेत कोरोना टेस्ट किट्सची टंचाई

  ओमिक्रॉन व्हेरियंट, आणि ख्रिसमसच्या सुट्ट्या असं एकत्र आल्यामुळे अमेरिकेत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी देशातील कोरोना टेस्ट किट्स अपुरे (America Covid Testing Problem) पडत आहेत. फाउची यांनी रविवारी ही बाब मान्य केली. तसेच, पुढील महिन्यापासून देशात पुरेसे कोरोना चाचणी किट्स उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी एबीसी न्यूज या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

  गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेतील कोरोना चाचणी टंचाईबाबत (Corona test crisis) बोलले जात होते. मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन (Joe Biden) यांनी ओमिक्रॉन आणि कोरोना चाचणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सुमारे 50 कोटी मोफत घरगुती कोरोना चाचण्या (Half billion Free home tests) करण्याच्या घोषणेचाही समावेश होता.

  दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या (America Corona cases) पुन्हा वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या सात दिवसांपासून दिवसाला सरासरी 1,90,000 कोरोना रुग्णांची नोंद होते आहे.

  First published:

  Tags: Corona spread, Corona updates, Covid-19, Covid-19 positive