मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

नर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात पाठवलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर...

नर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात पाठवलं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर...

रुग्णाने आधी अवयवदानाचा फॉर्म भरला होता. त्यामुळे मोठा घोटाळा समोर आला.

रुग्णाने आधी अवयवदानाचा फॉर्म भरला होता. त्यामुळे मोठा घोटाळा समोर आला.

रुग्णाने आधी अवयवदानाचा फॉर्म भरला होता. त्यामुळे मोठा घोटाळा समोर आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : एका रुग्णालयातील नर्सच्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या नर्सने जिवंत रुग्णाला बॅगेत पॅक करून शवगृहात ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. नर्सच्या या कृत्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणात रुग्णालयातील कर्मचाऱ्याची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 55 वर्षीय केविन रीड यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 5 सप्टेंबर रोजी रुग्णालयाच्या नर्सनी केविनला मृत घोषित करून बॉडी बॅगेत पॅक केली. हैराण करणारी बाब म्हणजे रुग्णाला डॉक्टरांनी नव्हे तर नर्सने मृत घोषित केलं. नर्सनी स्वत:च त्याला मृत घोषित केलं अन् शवगृहात ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांची टीम मृतदेहाचा तपास करण्यासाठी पोहोचली तेव्हा या घटनेचा खुलासा झाला.

केविनने मृत्यूपूर्वी अवयव दान केले होते. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्याचा मृतदेह तपासण्यासाठी शवगृहात पोहोचले. डॉक्टरांनी पाहिलं तर त्याचे डोळे उघडे होते. तोंडातून रक्त येत होतं. हे रक्त ताजं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यामुळे डॉक्टरांनी संशय आला. त्यांनी नर्सकडे डेथ सर्टिफिकेटची मागणी केली, मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. कारण डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित केलंच नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे सर्टिफिकेटही नव्हतं. ही घटना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील एका रुग्णालयातील असल्याचं समोर आलं आहे.

Shocking! रोमान्स करताना चढला इतका जोश की तरुणीने पाडला त्याच्या कानाचा तुकडा; कचाकचा चावूनही खाल्ला

नर्सच्या निष्काळजीपणामुळे खुलासा...

अशा प्रकारे नर्सच्या निष्काळजीपणाचा खुलासा झाला. तपास टीमच्या एका सदस्याने सांगितलं की, रुग्ण जिवंत असल्याची शक्यता होती. आणि रुग्ण बॅगेच्या बाहेर येण्यासाठी तडफडत असावा. मात्र श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

First published:

Tags: Crime news, Private hospitals