Home /News /videsh /

सर्वात सुरक्षित घर! बॉम्ब हल्लाही लावेल परतून; इतिहासात आहे वेगळी नोंद

सर्वात सुरक्षित घर! बॉम्ब हल्लाही लावेल परतून; इतिहासात आहे वेगळी नोंद

Nuclear Bunker Home For Sale : अॅटलस-एफ क्षेपणास्त्र कॉम्प्लेक्स अण्वस्त्रांच्या हल्ल्यालाही तोंड देऊ शकते. त्याची प्रॉपर्टी मार्केटमध्ये 4 कोटी 30 लाखांहून अधिक किमतीला विकली जात आहे. तरीही राहण्यासाठी हे एक विचित्र ठिकाण आहे.

  नवी दिल्ली, 30 जून : आपलं स्वतःचं एखादं लहानमोठं घर (Home) असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं; पण काही जणांना घराच्या नावाखाली एखादी खास आणि वेगळी जागा हवी असते. अशा व्यक्तींना कुठल्या तरी अनोख्या ठिकाणी राहण्याचा अनुभव घ्यायचा असतो. अशा व्यक्तींना खरेदी करण्यासाठी एक खास घर उपलब्ध आहे. या घरात कोणे एके काळी अमेरिकेची (America) पहिली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं (Intercontinental Ballistic Missile) ठेवण्यात आली होती. अ‍ॅटलास-एफ क्षेपणास्त्र संकुल (Atlas-F Missile Complex) अण्वस्त्रांच्या हल्ल्याला तोंड देऊ शकतं. हे घर प्रॉपर्टी मार्केटमध्ये 4 कोटी 30 लाख रुपयांहून अधिक किमतीला विकलं जात आहे. खरं तर राहण्यासाठी हे एक विचित्र ठिकाण आहे. क्षेपणास्त्र ठेवलेल्या जागेचा आतला भाग सामान्य घरांपेक्षा किती वेगळा असेल याचा विचार करा. जमिनीवरून तर हे घर दिसतसुद्धा नाही. 1962 मध्ये करण्यात आली बंकर हाउसची (Bunker House) उभारणी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असलेलं हे विचित्र घर 1962मध्ये बांधलं गेलं. या ठिकाणी अमेरिकेचं पहिलं आंतरखंडीय क्षेपणास्त्र ठेवण्यात आलं होतं. हे घर खूप मजबूत असून कोणत्याही अणुबॉम्ब हल्ल्यालाही (Nuclear Attack) तोंड देऊ शकतं. अमेरिकेतल्या नेब्रास्कामधल्या यॉर्क इथं बांधण्यात आलेल्या या बंकर हाउसमध्ये एकूण 2 मजले आहेत. हे घर 1256 स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधलं गेलं आहे. या घरात एक बेडरूम (Bedroom) आणि एक बाथरूम (Bathroom) आहे. सध्या जगातल्या अनेक देशांकडे अण्वस्त्रं आहेत आणि त्यांचा वापर करण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. अशा काळात हे घर सुरक्षिततेच्या दृष्टीनं चांगलं आहे; पण इथं राहणं सोपं नाही. कारण हे घर जमिनीखाली 174 फूट खोल बांधण्यात आलं आहे. घराला 9 फूट जाडीचं छत आहे.

  चांगली नोकरी सोडून मुलगी करतीये भटकंती; व्हॅनलाच बनवलंय घर, जाणून घ्या कहाणी

  सामान्य घरांच्या तुलनेत वेगळं आहे इंटिरिअर खाली उतरून घरात प्रवेश करताच पहिल्या मजल्यावर किचन, बाथरूम आणि बेडरूम आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी तयार करण्यात आल्या आहेत. येथे विजेचं कनेक्शन आहे आणि गरम, तसंच थंड पाणी उपलब्ध आहे. पाणी साठवण्यासाठी खोलीच्या मध्यभागी 500 गॅलनची टाकी आहे. झिलो (Zillow) या प्रॉपर्टी साइटवर सूचीबद्ध केलेल्या या घराचे फोटो पाहिल्यानंतर बरेच जण येथे राहण्याची कल्पनादेखील करू शकणार नाहीत. एवढंच नाही, तर घराचा दुसरा मजला पूर्ण बांधलेलाही नाही. या घरात एक बोगदाही आहे. या घराचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. या घराबाबत तुमचा काय विचार आहे?
  First published:

  Tags: Home dec

  पुढील बातम्या