नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : कोरोना महामारीनंतर अनेक नव्या गोष्टी आपण शिकलो. ‘वर्क फ्रॉम होम’ ही तोपर्यंत ठराविक लोकांपर्यंत मर्यादित असलेली ऑफिसच्या कामाची पद्धत त्याकाळात सार्वत्रिक बनली. वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकाच कंपनीसाठी काम करणाऱ्यांमध्ये बहुतेककरून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांचा समावेश होता. त्याबरोबरच ‘वर्क फ्रॉम गार्डन’चाही समावेश होऊ लागला. आता तर यूकेमध्ये ‘वर्क फ्रॉम पब’ ही पद्धत लोकप्रिय होत आहे. पब मालकांनीही कर्मचाऱ्यांसाठी खास सुविधा दिल्या आहेत. “यूकेमध्ये पब्सची संख्या वाढते आहे. त्यामुळे नफा कमवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबल्या जात आहेत. कर्मचाऱ्यांची वाढत्या विजबिलांतून सुटका व्हावी, यासाठी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम पब’ करण्याची परवानगी दिली आहे,” असं ‘द गार्डियन’च्या वृत्तात म्हटलं आहे. यामुळे पबमध्ये भरपूर लोक येतील व त्यामुळे पबचा महसूलही वाढेल. ‘फुलर्स चेन’च्या 380 पबमध्ये कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठीचं वातावरण मिळावं, या साठी सोय करण्यात आली आहे. त्यासाठी 10 युरो म्हणजे 900 रुपये द्यावे लागतील. त्यात जेवण आणि पेयांचा समावेश असेल. ‘ब्र्युवरी यंग’नं ‘वर्क फ्रॉम पब’साठी 185 पब्ससोबत दिवसाला 15 युरो म्हणजे 1300 रुपयांप्रमाणे सुविधा पुरवण्याचा करार केला आहे. या 1300 रुपयांत कर्मचाऱ्यांना हवी तेवढी सँडविचेस खाता आणि चहा-कॉफी पिता येऊ शकेल. अचानक दारू पिणं सोडल्यास शरीरावर काय होतो परिणाम? कोविड-19 महामारीनंतर विजेचा तुटवडा, जीवनावश्यक खर्चाचा बोजा अशा समस्या यूकेमध्ये निर्माण झाल्या. त्यामुळे आता यूकेमधील पब्जनी नागरिकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. ‘वर्क फ्रॉम पब’च्या सुविधेमध्ये कर्मचाऱ्यांना विजेची सोय, वाय-फाय, कामासाठी शांत वातावरण, मुबलक गरम किंवा गार पेयं, जेवण आणि प्रिंटिंग या गोष्टींचा समावेश आहे. “पबमध्ये काम करताना घरच्याप्रमाणे बागकाम करायला लागणं, पाळीव प्राणी जवळ येणं असे अडथळे काम करताना येणार नाहीत. तसंच पबमध्ये मिळणाऱ्या हव्या तितक्या सँडविचेस, चहा-कॉफीमुळे कर्मचाऱ्यांना आनंद मिळेल,” असं पबमधील एका ग्राहकानं ‘द गार्डियन’ला सांगितलं. यूकेमधील बारमध्ये लॅपटॉप असलेले म्हणजे व्यावसायिक कर्मचारी अधिक आकर्षित व्हावेत, या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. यूकेमधील जीवनावश्यक खर्चात झालेली वाढ पाहता, यामुळे कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन खर्चामध्ये वाढ होणार आहे. पब्ज कर्मचाऱ्यांना भरपूर सवलती व विविध ऑफर्स देत आहेत. त्यामुळे तिथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल. ‘वर्क फ्रॉम होम’पासून थोडी सुटका हवी असेल, तर यूकेमध्ये कर्माचाऱ्यांना आता ‘वर्क फ्रॉम होम’चा आनंद घेता येईल. तिथे कामाबरोबरच हवं तेवढं जेवण, ड्रिंक्स आणि वाय-फायही मिळेल. अर्थात त्यासाठी खिशाला थोडा फटका बसणार आहे हे मात्र नक्की. यूकेमध्ये आता ‘वर्क फ्रॉम पब’ची सोय, अनलिमिटेड ड्रिंक्स, जेवण आणि वाय-फाय सुविधाही मिळणार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.