रियो, 02 जुलै : आपल्या मालक आणि त्याच्या परिवाराची काळजी घेणारा इमानी प्राणी म्हणजे श्वान. मात्र याच श्वानानं त्याच्या परिवारातील सदस्यांना इजा पोहोचवली आहे. घरात खेळणाऱ्या दोन मुलांची रागातून कुत्र्यानं हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. असं नेमकं काय घडलं ज्यामुळे या कुत्र्यानं मालकिणीच्या दोन्ही नवजात बाळांना ठार मारलं.
द सन वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार ऐना आणि अनालू या दोन्ही नवजात जुळ्या मुलींचा 23 जूनला जन्म झाला. घरात दोन मुली आल्यानं आनंद साजरा केला जात होता. त्यामध्ये 29 वर्षीय एलेनावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या एलेनानं लॅब्रॅडोर जातीचा कुत्रा पाळला होता. ती खूप लाड करत होती. मात्र या कुत्रानं तिच्याच दोन नवजात मुलींचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
घरात दोन नवजात चिमुकल्या पऱ्या आल्यानं कुत्र्याकडे थोडं लक्ष कमी दिलं जात होतं. त्यामुळे आपल्यावरचं प्रेम कमी झालं की का? असा राग या कुत्र्याचा मनात निर्माण झाला असावा. या नवजात पऱ्या घरी आल्यापासून लॅब्रॅडोरचं वागणं बदललं होतं.
हे वाचा-मृत्यूचं तांडव! एका क्षणात जमिनीखाली दबून 50 मजूरांचा मृत्यू
एलेना म्हणाली की सुरुवातीला तिला सर्व सामान्य वाटले कारण बर्याचदा असे घडते. एकदिवस थोडं मुलांना सोडून दुसऱ्या खोलीत ऐलेना गेली असताना जलस झालेल्या कुत्र्यानं या दोन्ही मुलींना जखमी केलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कुत्र्याच्या हल्ल्यात नवजात मुलींचं पोटालाही गंभीर इजा झाली होती. त्यामुळे या चिमुकल्यांना वाचवणं डॉक्टरांना शक्य झालं नाही. जेलस झालेल्या कुत्र्यानं या नवजात मुलांना ठार केल्यानं एलेनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संकलन, संपादन- क्रांती कानेटकर