नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: जगातील वेगवेगळ्या देशांत (World tourism) भटकत राहणाऱ्या पर्यटकांसाठी (Nomads) सर्वोत्तम देश (Best country) कुठला, याचं उत्तर अखेर मिळालं आहे. भटक्या पर्यटकांसाठी सोयीच्या असणाऱ्या टॉप 25 देशांच्या यादीत (List of top 25 countries) संयुक्त अरब अमिरातीने (UAE) अव्वल स्थान पटकावलं आहे. या देशात असणाऱ्या विविध घटकांचा विचार करता जगातील सर्वोत्तम सुविधा या युएईमध्ये असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भटकण्याची आवड असणाऱ्यांसाठी युएई हाच सोयीचा देश असल्याचं सिद्ध झालं आहे. या कारणांमुळे ठरला अव्वल भटकणाऱ्या प्रवाशांसाठी सर्वात सोयीचा देश कुठला, यासाठी काही निकष ठरवण्यात आले होते. त्यानुसार युएईमध्ये सर्वोत्तम वायफाय सुविधा असल्याचं सिद्ध झालं आहे. युएईचं कोरडं वातावरणही पर्यटकांसाठी सोयीचं ठरत असल्याचं दिसून आलं आहे. युरोपातील अनेक देश हे सतत बदलणाऱ्या हवामानामुळे या निकषांवर पिछाडीवर पडले. कधी ऊन, तर कधी अचानक येणारा पाऊस या गोष्टी पर्यटकांसाठी गैरसोयीच्या ठरत असतात. मात्र युएईमध्ये सतत असणारं कोरडं वातावरण पर्यटकांच्या प्लॅनमध्ये कुठलेही अडथळे आणत नाही. त्यामुळे या निकषावर युएईनं बाजी मारली आहे. रस्त्यांचा सर्वोत्तम दर्जा हेदेखील युएईच्या यशाचं आणखी एक कारण ठरलं आहे. युएईमधील सर्व भागातले रस्ते हे चकाचक आणि गुळगुळीत आहेत. त्यामुळे पर्यटकांना प्रवासात कुठलेही अडथळे येत नाहीत. आठ आणि सोळा पदरी रस्त्यांचं नेटवर्क आणि रस्त्यांवर पर्यटकांसाठी असणाऱ्या विविध सुविधा या निकषांच्या जोरावर युएईनं या यादीत बाजी मारली आहे. पर्यटनाला येणार जोर युएईच्या खालोखाल डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी नंबर पटकावला आहे. दरवर्षी साधारणतः 3 लाख ब्रिटीश नागरिक हे जग भटकायला बाहेर पडतात, असा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनानं उच्छाद मांडल्यामुळे पर्यटक बाहेर पडले नाहीत. मात्र या वर्षीपासून पुन्हा एकदा पर्यटक जगभर भ्रमंती सुरू करतील, असा अंदाज आहे. हे वाचा -
हे आहेत टॉप 25 देश या यादीत स्थान पटकावलेले 25 देश असे आहेत.
- युएई
- डेन्मार्क
- ऑस्ट्रेलिया
- लक्झंबर्ग
- अमेरिका
- फिनलंड
- कॅनडा
- स्वित्झर्लंड
- जर्मनी
- नेदरलँड
- मोरोक्को
- सायप्रस
- ऑस्ट्रिया
- स्पेन
- नामिबिया
- कझाकस्तान
- स्वीडन
- इस्टोनिया
- सिंगापूर
- लिथुआनिया
- मोलदोवा
- फ्रान्स
- इस्रायल
- ब्रिटन
- टर्की