मराठी बातम्या /बातम्या /विदेश /जादू! आता TV वर दिसणारे पदार्थ चाटता येणार, Screen ला जीभ लावून घ्या चव

जादू! आता TV वर दिसणारे पदार्थ चाटता येणार, Screen ला जीभ लावून घ्या चव

जे पदार्थ टीव्हीवर दिसतात, ते त्याच वेळी चाखता आले तर? ही कविकल्पना वाटेल, मात्र शास्त्रज्ञांनी ते खरं करून दाखवलं आहे.

जे पदार्थ टीव्हीवर दिसतात, ते त्याच वेळी चाखता आले तर? ही कविकल्पना वाटेल, मात्र शास्त्रज्ञांनी ते खरं करून दाखवलं आहे.

जे पदार्थ टीव्हीवर दिसतात, ते त्याच वेळी चाखता आले तर? ही कविकल्पना वाटेल, मात्र शास्त्रज्ञांनी ते खरं करून दाखवलं आहे.

टोकियो, 25 डिसेंबर: टीव्हीवर (TV) जे पदार्थ (Food) आपण पाहतो, त्याची चव (Taste) आता टीव्हीवरच घेणं शक्य होणार आहे. ऐकून तुम्हाला ही एखादी कविकल्पना (Poetic concept) आहे, असं वाटेल. मात्र प्रत्यक्षात तसं नाहीय. जपानी शास्त्रज्ञांनी (Japani scientists) नुकताच एक नवा प्रयोग यशस्वी केला असून नागरिकांना घरबल्या आता टीव्हीवरील पदार्थांची चव चाखता येणार आहे. यासाठी बराच काळ झालेल्या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी हा प्रयोग य़शस्वी करून दाखवला.

काय आहे कल्पना?

आपल्याला टीव्हीवर जेव्हा एखादा पदार्थ दिसतो, तेव्हा तो चाखण्याची इच्छा होते. नंतर कधीतरी हा पदार्थ चाखता येईल, असा विचार करून त्या क्षणीची इच्छा मारून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. हा प्रकार होऊ नये आणि ज्या क्षणी एखादा पदार्थ चाखण्याची इच्छा होईल, त्या क्षणी तो चाखता यावा, या उद्देशाने हा टीव्ही तयार करण्यात जपानी शास्त्रज्ञांना यश आलं आहे.

असा तयार झाला टीव्ही

Taste The Television नावाच्या या डिव्हाईसमध्ये शास्त्रज्ञांनी वेगवेगळे 10 फ्लेवर्स ठेवण्यात आले आहेत. यात मुख्यत्वे दूध आणि चॉकलेटचा समावेश आहे. स्क्रीनवर एक प्लॅस्टिकचा फिल्म रोल देण्यात आला आहे. प्रेक्षकांना जो फ्लेवर चाखण्याची इच्छा होईल, त्या फ्लेवरचा स्प्रे रोलवर मारायचा आणि मनसोक्त चाटायचा, अशी ती कल्पना आहे. स्क्रीनवर लावण्यात आलेली प्लॅस्टिकची फिल्म ही वॉशेबल असणार आहे. दरवेळी ती धुवून त्यावर नवे फ्लेवर स्प्रे करता येतील आणि वाटेल तितका वेळ चाटता येतील.

हे वाचा - मृत्यूनंतर 29 वर्षांनी मायलेकीला मिळाला न्याय; HCने पतीला सुनावली मोठी शिक्षा

कोरोना काळासाठी उत्तम

कोरोना काळात अनेक नागरिक केवळ काहीतरी चाखण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे गर्दीचं प्रमाण वाढतं आणि कोरोना पसरायला हातभार लागतो. मात्र या नव्या प्रकारामुळे आता नागरिकांना कुठलाही फ्लेवर चाखण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. या नव्या प्रयोगाचं सध्या जपानमध्ये जोरदार स्वागत होत आहे.

First published:
top videos

    Tags: Recipie, Television