Home /News /videsh /

Alert! ब्रिटनमधील नव्या Corona Virus मुळे भारतासह 'या' देशांनी आंतराष्ट्रीय वाहतुकीवर घातली बंदी

Alert! ब्रिटनमधील नव्या Corona Virus मुळे भारतासह 'या' देशांनी आंतराष्ट्रीय वाहतुकीवर घातली बंदी

ब्रिटनमध्ये (Britain) कोरोना विषाणूचा नवीन (New Corona Virus) प्रकार सापडल्यापासून जगभरातील अनेक देश सतर्क झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 13 देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमान उड्डाणांवर बंदी (Flights ban) जाहीर केली आहे.

पुढे वाचा ...
    रियाध, 21 डिसेंबर: ब्रिटनमध्ये (Britain) कोरोना विषाणूचा नवीन (New Corona Virus) प्रकार सापडल्यापासून जगभरातील अनेक देश सतर्क झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 13 देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमान उड्डाणांवर बंदी (Flights ban) जाहीर केली आहे. भारतानेही याबाबत घोषणा करत 31 डिसेंबरपर्यंतच्या ब्रिटनच्या फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. ब्रिटनमध्ये (UK) अत्यंत वेगात पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या जातीची (new viral strain) माहिती समोर आल्यानं जगभर खळबळ उडाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सौदी अरेबियन (Saudi Arebia) आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह जमीन आणि समुद्रामार्गे होणाऱ्या प्रवासावरही किमान आठवडाभरासाठी बंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियाच्या अधिकृत प्रेस एजन्सीनं म्हटलं आहे की, 'काही अपवाद वगळता ब्रिटनला जाणारी आणि येणारी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं तात्पुरती थांबवित आहोत. तसेच ही बंदी पुढील एक आठवड्यासाठी वाढवली जाऊ शकते'. SPA ने गृह मंत्रालयाचा हवाला देत म्हटलं आहे की, 'या काळात जमीन आणि समुद्री मार्गांनेही देशात प्रवेश दिला जाणार नाही. सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद असेल. भारताने डिसेंबर अखेरीपर्यंत भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांवर क्वारंटाइनचे कडक नियम करण्यात आले आहेत. आतापर्यंत ब्रिटनमधून इथे आलेल्या किंवा ब्रिटनमधल्या कुठल्याही शहरात थांबा घेऊन आलेल्या (Transit passangers) प्रवाशांना कोरोना चाचणी (RT-PCR test) बंधनकारक करण्यात आली आहे. विमानतळावरच त्यांची चाचणी करावी आणि या चाचणीचा निकाल आल्याशिवाय त्यांना घरी जाता येणार नाहीस, असाही नियम करण्यात आला आहे. देशात नवीन प्रकारचा कोरोना विषाणू सापडला असून त्याचं संक्रमण वेगवान पद्धतीनं होत असल्याचा खुलासा ब्रिटननं केल्यानंतर, बर्‍याच युरोपियन देशांनी ब्रिटनमधून होणाऱ्या प्रवासावर बंदी घातली आहे. एसपीएनं म्हटलं आहे की, जे लोक युरोपमधून सौदी अरेबियात आले आहेत, त्यांनी किमान दोन आठवडे स्वत: ला अलग ठेवाव आणि कोरोना चाचणी करून घ्यावी. कुवेत आणि कॅनडा या देशांनी देखील यावर बंदी घातली आहे. तर फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, बेल्जियम, ऑस्ट्रिया, आयर्लंड आणि बल्गेरिया या देशांनी यापूर्वीच ब्रिटनच्या प्रवासावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. भारतातही ब्रिटनच्या प्रवासावर बंदी घालण्याच्या मागणीने जोर धरला आहे. तसेच याबाबतीत केंद्रीय मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठकही पार पडली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, United kingdom

    पुढील बातम्या