वॉशिंग्टन, 26 जुलै : वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका अमेरिकेची अंतराळ संस्था नासालासुद्धा बसला आहे. मंगळवारी मिशन कंट्रोल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक यांच्यातला संपर्क तुटला. मिशन कंट्रोल वरून स्टेशनवर संदेश पाठवता आले नाही आणि कक्षेत असलेल्या सात अंतराळ यात्रींसोबत बोलणं होऊ शकलं नाही. ह्युस्टनच्या जॉन्सन स्पेस सेंटरच्या इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे अचानक वीज गेली. रशिया-युक्रेन यांच्यात तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेला बिघडणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियाच्या स्पेस एजन्सीची मदत घ्यावी लागली. स्पेस स्टेशन प्रोजेक्स व्यवस्थापक जोएल मोंटेलबानो यांनी म्हटलं की, वीज गेल्यानं अंतराळातील अंतराळवीर किंवा स्टेशन यापैकी कोणीही धोक्यात नव्हतं. बॅकअप यंत्रणेनं सर्व काम ९० मिनिटांच्या आत सांभाळलं. वीज गेल्यानंतर २० मिनिटांच्या आत रशियन यंत्रणेच्या माध्यमातून समस्येबद्दल माहिती देण्यात आली होती. नासाला आशा आहे की, दिवसअखेर ही समस्या सोडवली जाईल आणि सर्व सुरळीत सुरू होईल. Anju Nasrullah News: पाकिस्तानात जाऊन निकाह करणाऱ्या अंजूची प्री-वेडिंग फोटोशूट, Video समोर पहिल्यांदाच स्पेस स्टेशन आणि नासाच्या कमांड सेंटरमधला संपर्क तुटल्याचा प्रकार घडला आहे. बॅक अप सिस्टिमच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. रशियन सिस्टिमच्या माध्यमातून अंतराळवीरांशी बोलणं झालं. रशियासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा अमेरिकन स्पेस एजन्सीला रशियाकडून मदत घ्यावी लागली. युद्धजन्य स्थितीतही दोन्ही देशाच्या स्पेस एजन्सींनी सोबत काम केलं. रशियाने म्हटलं की, २०२४ नंतर ते आंतरराष्ट्रीय स्पेश स्टेशनमधून बाजूला होतील आणि स्वत:चं स्टेशन तयार करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.