लंडन, 2 जानेवारी: नेहमीप्रमाणे 19 किलोमीटरचा प्रवास (19 km journey) करण्यासाठी त्याने मध्यरात्री ( Midnight) उबरची टॅक्सी (Uber Taxi) बुक केली. टॅक्सीत बसून घर गाठलं आणि गाढ झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याने जेव्हा इनबॉक्स (Inbox) चेक केला,तेव्हा मात्र त्याला जबर धक्का (Shocked) बसला. कारण त्या प्रवासाचं बिल आलं होतं 104 युरो, म्हणजेच तब्बल 10 हजार 500 (Rs. 10,500) रुपये. हे अव्वाच्या सव्वा बिल पाहून त्याचे डोळेच पांढरे झाले. मध्यरात्री केली टॅक्सी मँचेस्टरमध्ये राहणारा सॅम जॉर्ज हा 21 वर्षांचा तरुण मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. त्यांची पार्टी संपली मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमाराला. त्यानंतर सर्वांना घरी जायचं होतं. त्यांनी आजूबाजूला टॅक्सी उभ्या आहेत का, याचा शोध घेतला. मात्र तिथं एकही टॅक्सी उभी नव्हती. बराच वेळ इतर कुठलीही टॅक्सी परिसरात येत नव्हती. त्यामुळे त्यांनी उबरची टॅक्सी बुक केली.
पार्टीपेक्षा उबर महाग उबर टॅक्सी बुक करताना अंदाजे किती भाडं पडेल, हे सांगितलं जातं. ते मान्य असेल, तर बुकिंग करणं निश्चित करता येतं. मात्र पार्टी झाल्यानंतर टॅक्सी बुक करताना किती भाडं दाखवलं जातंय, ते आपण पाहिलंच नाही, असं सॅम म्हणतो. आपण नेहमीच या मार्गावरून प्रवास करतो आणि त्यासाठी साधारण दोन ते अडीच हजार रुपये लागतात. त्याच आसपास काहीतरी बिल असेल, असं आपल्याला वाटलं. मात्र प्रत्यक्षात बिल पाहून आपल्याला धक्का बसल्याचं तो म्हणाला. पार्टीपेक्षा जास्त खर्च उबरसाठी झाल्याचं त्यानं म्हटलं. 19 किलोमीटरसाठी एवढे पैसे? आपण जेवढा प्रवास केला, त्यासाठी नेहमी साधारण 25 युरोच्या आसपास बिल येतं. मात्र यावेळी थेट चौपट बिल कसं येऊ शकतं, असा सवाल सॅमने उपस्थित केला आहे. हे वाचा- राज्यात हवामानाची आंधळी कोशींबीर; पुन्हा गायब होणार थंडी, काय असेल स्थिती? मागणी आणि पुरवठा उबरच्या दरांचं गणित हे मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतं. जास्त मागणी असेल, तर दर वाढतो आणि मागणी घटली की दर कमी होते. मध्यरात्रीच्या सुमाराला इतर टॅक्सी उपलब्ध नसल्यामुळे मागणी वाढलेली होती. त्यामुळेच दरही चढे होते, असं उबरनं म्हटलं आहे. ट्रिप कन्फर्म होण्यापूर्वी अंदाजित दर दाखवला जातो. तो स्विकारल्यावर टॅक्सी बुक होते. त्यामुळे आता तक्रार करण्याला काहीच अर्थ नसल्याचं उबरनं म्हटलं आहे.