मुंबई, 21 जुलै : स्त्रिया बाळांना जन्म देतात, पण पुरुषांनी कधी बाळाला जन्म दिल्याचं तुम्ही ऐकलंय का? एका पुरुषाने मुलाला जन्म दिला आहे, कारण त्याची जोडीदार बाळाला जन्म द्यायला वैद्यकीयदृष्ट्या फिट नव्हती. ती गरोदर राहू शकत नव्हती. पुरुषाने बाळाला जन्म दिला ही बातमी समजल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पिता आपल्या मुलाला जन्म कसा देऊ शकतो, असा प्रश्न लोकांना पडत आहे. पण 27 वर्षीय सेलेब बोल्डनने खरोखर बाळाला जन्म दिलाय. त्याची 25 वर्षांची पत्नी नियाम बोल्डेन गर्भवती होऊ शकत नव्हती, म्हणून तिने ट्रांझिशन जर्नी थांबवली. सेलेब बोल्डन एक ट्रान्सजेंडर पुरुष आहे. तो आधी एक स्त्री होता आणि आता पुरुष होण्यासाठी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. त्याचे शरीर बऱ्याच अंशी पुरुषी झाले आहे. मात्र नियाम गरोदर राहू शकत नसल्याचे समजल्यानंतर त्याने काही काळ उपचार थांबवले. सेलेब गरोदर राहिला आणि त्याने एका मुलाला जन्म दिलाय. आता तो पुढील उपचार पूर्ण करणार आहे. या जोडप्याने मुलीचे नाव इल्सा रे असे ठेवलं आहे. सेलेब म्हणाला, ‘मी इतर ट्रान्स लोकांना सांगू इच्छितो की बाळ कॅरी करणं चुकीचं नाही.’ Crime News: पत्नीला रात्री बेशुद्ध करायचा; मग अनोळखी पुरुषांना घरी बोलवायचं अन्..अखेर 10 वर्षांनी खुलासा न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, नियामचा तीन वेळा गर्भपात झाला आहे. त्यानंतर तिला डॉक्टरांनी सांगितले की आता ती आई होऊ शकणार नाही, कारण तिची एग्ज परिपक्व झालेले नाहीत आणि फर्टिलाइज करता येणार नाहीत. हे कुटुंब इंग्लंडमधील केंब्रिजमध्ये राहते. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर सेलेबने मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. गर्भवती होण्यासाठी त्याने टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन घेणं बंद केलं. ट्रान्सजेंडर सेलेबसाठी हा कठीण निर्णय होता. 2017 मध्ये त्याने शरीरात बदल करण्यास सुरुवात केली होती, तो व्यवसायाने स्टोअर मॅनेजर आहे. तो म्हणाला, “हा निर्णय कठीण होता, मला लहानपणापासूनच माहीत होते की मला लिंग बदल करावा लागेल. पण मला आणि माझ्या पार्टनरला खूप दिवसांपासून बाळ हवं होतं. म्हणून मी ते करायचं ठरवलं. 27 महिन्यांपासून घेत असलेले इंजेक्शन जानेवारी 2022 मध्ये मी घेणे बंद केले.” सोशल मीडियावर या जोडप्याने त्यांच्या स्पर्म डोनरची भेट घेतली. सहा महिने आणि तीन प्रयत्नांनंतर सेलेब गर्भवती झाला. यादरम्यान कुटुंबीय आणि मित्रमंडळींचा पूर्ण पाठिंबा होता. पुरुष गरोदर होऊ शकत नाही, असं अनेकांनी म्हटलं होतं, पण सेलेबने हे करून दाखवलं. त्याने मे 2023 मध्ये एका मुलीला जन्म दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.