ल्युटन, 24 फेब्रुवारी : मॅक्डोनाल्ड्सचं
(McDonald's) 'मिल' खूप प्रसिद्ध आहे. साधारणपणे हे मिल 200 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळतं. पण कधी यासाठी 2 लाख रुपयांचा दंड झाल्याचं ऐकलं आहे? नाही ना? पण ब्रिटनमध्ये नुकतीच अशा प्रकारची घटना समोर आली असून एका व्यक्तीला आपल्या नातवाला हे मिल खाऊ घालताना 2 लाख रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधील ल्युटनमध्ये राहणारे जॉन बॅबेज आपला नातू टायलरला हे मिल खाऊ घालण्यासाठी घेवून गेले होते. यासाठी त्यांनी 2.79 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 200 रुपये दिले. परंतु त्यानंतर आपल्या नातवाच्या प्रेमापोटी त्यांनी केलेल्या एका कृत्यामुळे त्यांना 2,800 डॉलर म्हणजेच 2 लाखांचा दंड भरावा लागला आहे. हे मिल खाऊन झाल्यानंतर त्यांचा नातू काहीकाळ मित्रांबरोबर खेळण्यासाठी थांबला होता. यावेळी त्यांनी गाडी फ्री पार्किंगमध्ये पार्क केली. पण वेळेत त्यांना झोप लागली आणि त्यांची फ्री पार्किंगची वेळ संपली. 2 तासांची फ्री पार्किंगची वेळ होऊन, वर त्यांना 17 मिनिटं झाली. त्यामुळे त्यांना याचा दंड ठोठावण्यात आला.
75 वर्षीय बॅबेज यांनी मिररला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दंड आकारण्यात आल्याची कोणतीही माहिती नव्हती. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या दंडाच्या पावत्या अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावर पाठवल्या आहेत. परंतु एक दिवस अचानक वसूली करणार्या कंपनी डीसीबीएलच्या अधिकाऱ्यांनी घरी येत दंडाची रक्कम भरण्याची मागणी केली. यामध्ये 400 युरो दंड आणि 1,651 युरो असे एकूण भारतीय चलनात 2 लाख रुपये भरण्याची मागणी केली.
डीबीसीएलच्या अधिकाऱ्यांनी बॅबेजच्या घरी भेट दिल्याच्या काही दिवस अगोदर कंपनी हायव्ह्यू पार्किंग कंपनीला काऊन्टी कोर्टाचा निकाल मिळाला आहे. त्यानंतर आता या खटल्याची सुनावणी मार्च महिन्यात होणार आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील मॅक्डोनाल्ड्सच्या(McDonald's) मिलसाठी अनेकांना दंड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील महिन्यात एका महिलेला आपल्या बहिणीसह 100 मैलचा प्रवास केल्याप्रकरणी 200 युरोंचा दंड ठोठावण्यात आला होता. कोरोना व्हायरसच्या संकटात लिंकनशायर ते स्कार्बरोपर्यंत तीन काउंटींतून प्रवास करणं हे आवश्यक नसल्याचं म्हणत या महिलेला दंड करण्यात आला होता.
आणखी एका घटनेत अशाच पद्धतीने एका व्यक्तीने त्याच्या शहरात मॅक्डोनाल्ड्स नसल्याने 160 किलोमीटरचा प्रवास करत कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं. या घटनेची पोलिसांनी ट्वीटरवर माहिती देताना या व्यक्तीची कृती लॉकडाउन नियमांचा भंग असल्याचं म्हणत त्याला 200 युरोचा म्हणजेच 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.