मराठी बातम्या /बातम्या /विदेश /OMG! या अवलियानं जमवल्या 10 लाख सिगरेट; वाचा, फिटनेसची अनोखी कहाणी

OMG! या अवलियानं जमवल्या 10 लाख सिगरेट; वाचा, फिटनेसची अनोखी कहाणी

एका व्यक्तीनं आतापर्यंत 10 लाख (Man collects 10 lac cigarette and gives  fitness mantra to the world) सिगरेट गोळा करून काय केलं, हे वाचलं तर कुणालाही आश्चर्य आणि अभिमान वाटेल.

एका व्यक्तीनं आतापर्यंत 10 लाख (Man collects 10 lac cigarette and gives fitness mantra to the world) सिगरेट गोळा करून काय केलं, हे वाचलं तर कुणालाही आश्चर्य आणि अभिमान वाटेल.

एका व्यक्तीनं आतापर्यंत 10 लाख (Man collects 10 lac cigarette and gives fitness mantra to the world) सिगरेट गोळा करून काय केलं, हे वाचलं तर कुणालाही आश्चर्य आणि अभिमान वाटेल.

एका व्यक्तीनं आतापर्यंत 10 लाख (Man collects 10 lac cigarette and gives  fitness mantra to the world) सिगरेट गोळा करून काय केलं, हे वाचलं तर कुणालाही आश्चर्य आणि अभिमान वाटेल. आयुष्यात एखादी व्यक्ती जेव्हा हार मानते, तेव्हाच त्या व्यक्तीचं करिअर (Career lasts until hope) संपल्याचं मानलं जातं. मात्र जोपर्यंत व्यक्तीच्या मनातील उमेद आणि जिद्द कायम आहे, तोपर्यंत त्याला काहीच अशक्य नसतं. हेच दाखवून (Miguicho of Ecudor) दिलंय इक्वेडोरच्या गालापागोस बेटावरच्या मिगुइचो नावाच्या व्यक्तीनं. मिगुइचोच्या आयुष्याचा प्रवास कुणालाही थक्क करणारा आहे.

नियतीचे खेळ

मिगुइचो पाच वर्षांचे असताना त्यांच्या आईनं निधन झालं. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे वडीलदेखील देवाघरी गेले. कोवळ्या वयात अनाथ झाल्यामुळे त्यांचं शिक्षण सुटलं. मिळेल ते काम करून पोट भरणं हेच त्यांच्या नशीबी आलं. त्यातूनच ते मासेमारी शिकले आणि समुद्रात जाऊन मासेमारी करू लागले. काही वर्षांपूर्वी ते समुद्रात मासेमारीसाठी गेले असताना मोठं वादळ आलं आणि ते समुद्रात अडकून पडले. तब्बल 77 दिवस ते समुद्रात अडकून पडले होते. त्यानंतर त्यांची सुटका झाली, मात्र इतके दिवस समुद्रात अडकून पडल्यामुळे त्यांना कर्ज फेडणं कठीण झालं.

तुरुंगवारी

कर्ज फेडता न आल्यामुळे वयाच्या 35 व्या वर्षी ते तुरुंगात गेले. सततच्या नियतीच्या हल्ल्यामुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मिगुइचो यांनी मद्यप्राशन करायला सुरुवात केली. त्यानंतर एकामागून एक अशी अनेक व्यसनं त्यांना जडली. व्यसनांच्या खाईत लोटल्या गेलेल्या मिगुइचो यांना पुढची वीस वर्ष या व्यसनानं ग्रासलं. मात्र तरीही जगण्याची उमेद सुटली नव्हती.

52 व्या वर्षी व्यायामाला सुरुवात

सर्व व्यसनांना फाटा देत त्यांनी वयाच्या 52 व्या वर्षी जोमाने व्यायामाला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू त्यांची तब्येत सुधारू लागली. त्यांनी व्यायाम आणि धावण्याचा सराव कायम ठेवत वयाच्या 68 व्या वर्षी आयुष्यातील पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.

हे वाचा- गळ्यातील फास आवळत इंजिनिअर तरुणीचा मित्राला फोन, म्हणाली...

सिगरेटचा संग्रह

मिगुइचो यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत रस्त्यावर पडलेली सिगरेटची थोटकं गोळा करायला सुरुवात केली. या थोटकांपासून ते वेगवेगळ्या कलाकृती आणि शिल्पं बनवतात. त्यांच्या या उपक्रमाचं सध्या सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.

First published:
top videos

    Tags: Fitness, Health, Motivation