जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / George Floyd Death Protest : अमेरिकेत आंदोलना हिंसक वळण, वॉशिंग्टनमधील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

George Floyd Death Protest : अमेरिकेत आंदोलना हिंसक वळण, वॉशिंग्टनमधील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

George Floyd Death Protest : अमेरिकेत आंदोलना हिंसक वळण, वॉशिंग्टनमधील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

अमेरिकी दूतावासातर्फे याबाबत अधिकृतपणे निवेदन जाहीर करण्यात आले नसले तरी वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान केल्याच्या खटल्याची चौकशी युनायटेड स्टेट्स पार्क पोलीस करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 04 जून : कोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाला हादरून सोडलं आहे, मात्र अमेरिकेत सध्या एका वेगळ्याच कारणांमुळं संपूर्ण देश तापला आहे. या सगळ्या मागचं कारण आहे अमेरिकेतील मिनियापोलीस इथं जॉर्ज फ्लॉईड (George Floyd Death Protest 47 वर्ष) या कृष्णवर्णीय नागरिकाचा झालेला मृत्यू. यामुळे संपूर्ण शहरात निदर्शनं सुरू आहेत, याचे पडसाद साऱ्या जगावर उमटण्यास सुरुवात झाली आहे. यातच बुधवारी काही निदर्शकांनी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दुतवासासमोर असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली. त्यानंतर भारतीय दुतवासानं हा मुद्दा ट्रम्प यांच्यापर्यंत नेला आहे. ज्यावर व्हाइट हाऊसच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी 30 सप्टेंबर 2014 रोजी महात्मा गांधीच्या पुतळ्याला भेट देऊन श्रध्दांजली वाहिली होती. या घटनेनंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला कपड्यानं झाकून ठेवण्यात आले आहे. अमेरिकी दूतावासातर्फे याबाबत अधिकृतपणे निवेदन जाहीर करण्यात आले नसले तरी वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान केल्याच्या खटल्याची चौकशी युनायटेड स्टेट्स पार्क पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी 16 सप्टेंबर 2000 रोजी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासासमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्याखेरीज अमेरिकेत बर्‍याच शहरांमध्ये महात्मा गांधींच्या दोन डझनहून अधिक पुतळे आहेत. अमेरिकेत का होत आहे निदर्शनं? जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय नागरिकाला पोलिसांनी 20 डॉलरची खोटी नोट एका दुकानात चालवल्याप्रकरणी अटक केली होती. 25 मे रोजी मिनेसोटा राज्यातील मिनिआपोलिस शहरात पोलिसांकडून अटक केली जात असताना जॉर्ज यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जॉर्ज यांना गळ्यावर गुडघा ठेवून बसलेल्या एका पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये जॉर्ज मला श्वास घेता येत नसल्याचं पोलिसांना सांगताना दिसत आहेत. तरी, पोलिसांनी गळ्यावर गुडघा जोरात दाबला, यातच जॉर्ज यांचा मृत्यू झाला. दरम्यान या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरामुळं पुन्हा एका अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फुटली आहे. G-7 परिषद देखील पुढे ढकलली दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी -7 शिखर परिषद सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच, जगातील अव्वल अर्थव्यवस्था, जी 10 किंवा जी 11 या देशांच्या या गटात भारत आणि अन्य तीन देशांच्या समावेशासह या ‘जुन्या’ गटाचा विस्तार करण्याची इच्छा व्यक्त केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात