नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : भारतात चिनी उत्पादनांचा विरोध केला जात आहे, आणि यातच काही कंपन्या नवनव्या क्लृप्त्या शोधून काढत आहेत. सर्वसाधारणपणे चिनी वस्तुंवर मेड इन चायना लिहिलेलं असतं. मात्र भारतात या कंपन्यांच्या वस्तुंवर Made in PRC लिहिलं आहे. यामुळे अनेक ग्राहकांचा गोंधळ होऊ शकतो. Boat नावाची अशीच एक कंपनी आहे जी ऑडिओ प्रोडक्ट तयार करते. भारतात याचे एअरफोन्स विशेषत: प्रसिद्ध आहेत. या कंपनीने आपल्या प्रॉडक्टच्या खाली Made In P.R.C. लिहिलं आहे. ही कंपनी भारतातील आहे.
या कंपनीचे प्रॉडक्ट्स मेड इन चायना असल्याकारणे ते Made In P.R.C असं लिहित आहेत. P.R.C म्हणजे Peoples Republic of China. म्हणजेच हेदेखील मेड इन चायना लिहिण्याची वेगळी पद्धत आहे, असं म्हणता येईल. याबाबत एका ट्विटला प्रत्युत्तर देताना कंपनीने सांगितले की, -चीन आमच्या वॅल्यू चेनचा एक भाग आहे. आम्ही 100 टक्के इंडियन ब्रँड आहोत. आम्ही येथे एम्पलॉयमेंट जनरेट करतो आणि आम्ही दुसऱ्या कंपनीप्रने चीनला पैसे पाठवत नाही.
Hey boAthead,
— boAt (@RockWithboAt) August 20, 2020
See China is only a part of our value chain. We are 100 percent an Indian brand. We generate employment here and we don’t repatriate any funds back to China unlike all other companies that we take on.
Regards
boAt crew
ही पहिलीच वेळ नाही की जेव्हा एखाद्या प्रॉडक्टच्या मागे Made In P.R.C असं लिहिलं आहे. याशिवाय काही चिनी कंपन्याही आपल्या प्रॉडक्टच्या मागे Made In P.R.C असं लिहितात.