मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Success Story: तब्बल 100 वेळा अपयशी होऊनही मानली नाही हार; जिद्दीनं महिला झाली अब्जाधीश

Success Story: तब्बल 100 वेळा अपयशी होऊनही मानली नाही हार; जिद्दीनं महिला झाली अब्जाधीश

कितीही अपयश आलं तरी आपलं ध्येय गाठून जगासमोर आदर्श ठेवणारे खूप कमी जण असतात.

कितीही अपयश आलं तरी आपलं ध्येय गाठून जगासमोर आदर्श ठेवणारे खूप कमी जण असतात.

कितीही अपयश आलं तरी आपलं ध्येय गाठून जगासमोर आदर्श ठेवणारे खूप कमी जण असतात.

  हार न मानता प्रयत्न करणाऱ्याला यश (success story) मिळतंच. कुठलाही दिवस हा शेवटचा नसतो. आपण फक्त लढायचं असतं आणि काम करणार्‍याला यश १०० टक्के मिळतंच. फक्त आपलं ध्येय गाठण्यासाठी पुढे जात राहावं आणि हार मानू नये. कितीही अपयश आलं तरी आपलं ध्येय गाठून जगासमोर आदर्श ठेवणारे खूप कमी जण असतात. कॅनव्हा (Canva) या ग्राफिक डिझाइन कंपनीची (graphic design company) सहसंस्थापक आणि सीईओ मेलिना पर्किन्स (Melina Perkins) ही त्यामधलीच एक.

  आज अब्जाधीश असलेल्या मेलिना पर्किन्सला आयुष्यात 100 हून अधिक नकार पचवावे लागले; मात्र आज व्यवसायात तिनं जी उंची गाठली ती गाठणं फारच कमी लोकांना शक्य असतं. ज्या व्यक्तींना काही तरी मोठं करायचं आहे, मात्र वारंवार अपयशाला सामोरं जावं लागतंय अशांसाठी मेलिना हिची कथा प्रेरणादायी आहे.

  कॅनव्हा हा एक ग्राफिक डिझाइन (graphic design) ऑनलाइन प्लॅटफॉर्म (nline platform) आहे. इथं तुम्हाला हवी असलेली कोणतीही रचना करता येते. जेव्हा तुम्ही Google मध्ये Canva सर्च करून वेबसाइट उघडता तेव्हा Canva Design for everyone असं शीर्षक दिसतं. ज्यांना डिझायनिंगचं ज्ञान नाही, तेसुद्धा अगदी सहजपणे Canva मध्ये डिझाइन बनवू शकतात. डिझायनिंगच्या ज्ञानाशिवाय सुंदर डिझाईन्स बनवता येतात हे Canva चं वैशिष्ट्य आहे. व्यावसायिक डिझायनर आणि ज्यांना कदाचित अगदी डिझाइनचं स्पेलिंग कसं लिहावं, हेदेखील माहिती नसेल, अशा व्यक्तीही आता या वेबसाइटचा वापर करतात.

  हे वाचा - Savings अकाउंट चांगलं की Salary अकाउंट? वाचा नक्की काय कोणत्या अकाउंटमुळे होणार तुमच्या खिशाला फायदा

  मेलिना आता फक्त 34 वर्षांची आहे. तिचा जन्म 1987 साली ऑस्ट्रेलियामध्ये झाला. 2007 मध्ये ती एका विद्यापीठात अर्धवेळ शिकवत होती. तिला मुलांना डेस्कटॉप डिझाइन सॉफ्टवेअर शिकवायचं होतं. मेलिनाला असं वाटलं, की सॉफ्टवेअर खूप गुंतागुंतीचं आहे आणि ते शिकणं आणि शिकवणं सोपं नाही. तसंच ते सॉफ्टवेअर खूप महागदेखील आहे. त्यावरून तिला कॅनव्हा बनवण्याची कल्पना सुचली. तिला वाटलं, की एक असं साधन असावं ज्यामध्ये कोणीही डिझाइन बनवू शकेल.

  मेलिनाने नंतर व्यवसाय भागीदारासह फ्युजन बुक्स नावाची कंपनी सुरू केली. फ्युजन बुक्स ही एक डिझाईन कंपनी होती. क्लिफ ओब्रेक्ट हा मेलिनाचा व्यवसाय भागीदार होता. नंतर दोघांनी लग्न केलं. 2012 मध्ये कॅमरून अॅडम्स नावाची दुसरी व्यक्ती त्यांच्यात सहभागी झाली आणि तिघांनी मिळून कॅनव्हा हा उद्योग सुरू केला. कॅनव्हा इतर प्लॅटफॉर्मपेक्षा खूपच सोपं आहे.

  प्रत्येक व्यवसायाचं यश कधी आणि किती निधी मिळतो यावर अवलंबून असतं. कोणाची कल्पना 100 पेक्षा जास्त वेळा नाकारली गेली तर समोरची व्यक्ती त्याच्या कल्पनेवर शंका घेण्यास सुरुवात करेल; पण मेलिनाच्या बाबतीत असं घडलं नाही. तिला स्वतःवर आणि तिच्या कल्पनेवर पूर्ण विश्वास होता. कंपनीला पहिला निधी मिळण्यासाठी तीन वर्षं लागली. मेलिना पर्किन्स स्वतः सांगते, की प्रत्यक्षात तिच्या चुकीच्या दृष्टिकोनामुळे निधी मिळवण्यात अडचण आली. चुकीच्या दृष्टिकोनाचा अर्थ असा आहे, की कंपनी व्यवसाय जसा पाहिजे तसा करत नाही. फक्त काही टेक्निकल बाबींमध्ये अडकून पडली आहे. जेव्हा संभाव्य गुंतवणूकदाराशी चर्चा होते, तेव्हा त्यांना कॅनव्हाचं टेक्निकल सोल्युशन सांगितलं जातं. त्यामुळे अशा शेकडो मीटिंग्ज अयशस्वी झाल्या.

  मेलिना पर्किन्स आणि तिच्या भागीदारांना हळूहळू लक्षात आलं, की गुंतवणूकदारांना टेक्निकल सोल्युशन माहिती असणं आवश्यक नाही. त्यांना आणखी काही जाणून घ्यायचं आहे. मग त्यांनी आपला दृष्टिकोन बदलला. आता त्यांनी संभाव्य गुंतवणूकदारांना एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. मेलिना गुंतवणूकदारांना सांगत असे, की तिचे विद्यार्थी कसे नाराज आहेत. ते म्हणायचे, की सॉफ्टवेअरची बटणं कुठे आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण सेमिस्टर लागतं. या समस्येचं निराकरण करण्यासाठी कॅनव्हा तयार केलं गेलं आहे. आता लोक कॅनव्हाशी जोडले जात आहेत. या गोष्टी गुंतवणूकदारांपुढे ठेवल्याने त्यांनी कंपनीबाबत विश्वास वाटू लागला. परिणामी कंपनीची वाढ वेगाने होऊ लागली.

  हे वाचा - आठव्यांदा प्रेग्नंट 6 मुलांची आई; लोक विचारतात 'एवढ्यांचं पालनपोषण कसं करणार'

  गेल्या दोन-तीन दिवसांत मेलिना पर्किन्सचा उल्लेख जगभरातली वृत्तपत्रं, न्यूज वेबसाइट्स आणि टीव्ही चॅनल्समध्ये होत आहे. याचं कारण म्हणजे कॅनव्हाला नुकतीच 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक मिळाली. या गुंतवणुकीनंतर कॅनव्हा ही एका स्त्रीद्वारे चालवल्या जाणाऱ्या जगातल्या सर्व स्टार्ट-अप्समध्ये पहिल्या क्रमांकाची स्टार्टअप बनली आहे. कंपनीचं मूल्य सध्या 40 अब्ज डॉलर्स आहे. रुपयांमध्ये याची किंमत 22 ट्रिलियनपेक्षा जास्त आहे.

  First published:
  top videos

   Tags: Success story