मराठी बातम्या /बातम्या /विदेश /'तुमच्याकडे केवळ 50 दिवस शिल्लक' म्हणत कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी

'तुमच्याकडे केवळ 50 दिवस शिल्लक' म्हणत कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

ह्यूस्टन, 18 एप्रिल: अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांना मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी फ्लोरिडा येथील 39 वर्षीय नर्सला अटक (Nurse arrested) करण्यात आले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने केलेल्या तपासानंतर निवियाने पेटिट फेल्प्स हिला अटक करण्यात आले आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फेल्प्स हिने 13 फेब्रवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

फेल्प्स ही एक नर्स आहे. आरोपांनुसार, तिने कारागृहात असलेल्या आपल्या पतीला व्हिडीओ पाठवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. या व्हिडीओत तिने म्हटलं, 'कमला हॅरिस तू मरणार आहेस, तुझ्याकडे आता मोजण्या इतकेच दिवस शिल्लक आहेत.' 18 फेब्रुवारी रोजी पाठवण्यात आलेल्या आणखी एका व्हिडिओत तिने म्हटलं, 'मी गन रेंज जात आहे. परमेश्वराची शपथ घेऊन सांगते की तुझा शेवटचा दिवस आहे, तू मरणार आहे. तुझ्याकडे 50 दिवस आहेत. हा दिवस लिहून ठेव.'

वाचा: अमेरिकेत FedEx सेंटरवर गोळीबार; 4 शीख बांधवांसह 8 जणांचा मृत्यू, हल्लेखोरानं स्वतःवरही झाडली गोळी

सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ फ्लोरिडाच्या युनायडेट स्टेट्स डिस्ट्रिक्ट कोर्टात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नर्सने 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तक्रारीनुसार, आरोपी फेल्प्सने फेब्रुवारी महिन्यात शस्त्र परवान्यासाठीही अर्ज केला होता. 3 मार्च रोजी सिक्रेट सर्व्हिस आणि डिटेक्टिव्ह हे फेल्प्सच्या घरी चौकशीसाठी गेले होते मात्र, तिने त्यांच्यासोबत बोलण्यास नकार दिला होता.

यानंतर 6 मार्च रोजी सिक्रेट सर्व्हिस एजेंटने फेल्प्स सोबत पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तक्रारीत म्हटले आहे की, फेल्प्सने सांगितलं की, कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष बनल्या तेव्हापासून तिला त्यांच्याबद्देल द्वेष होता.

First published:
top videos

    Tags: Kamala Harris, United States of America