काबुल, 5 सप्टेंबर : एकीकडे युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना दुसरीकडे काबूलमध्ये रशियाला टार्गेट करण्यात आलं आहे. युक्रेनमधील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. तर काबूलमध्ये रशियन दूतावासावर आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून काबूल सतत धगधगत आहे. तिथे खूप जास्त तणाव आहे. पुन्हा एकदा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ला झाला आहे. रशियन दूतावासाबाहेर हा आत्मघातकी हल्ला घडवून आणण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये 2 अधिकाऱ्यांसह 20 जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानमधील काबूल इथल्या रशियन दूतावासाबाहेर हा आत्मघातकी हल्ला झाला.रशियन दूतावासाच्या प्रवेशद्वाराजवळ हल्लेखोरांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला. तिथल्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला आधिच ओळखलं होतं. त्यांनी गोळी देखील चालवली. मात्र हल्लेखोर दूतावासाजवळ पोहोचण्यात यशस्वी झाला. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यामागचं कारण अजून समोर आलं नाही.
10 killed, 8 injured in blast near Russian Embassy in Kabul
— ANI Digital (@ani_digital) September 5, 2022
Read @ANI Story | https://t.co/a1SykWk9G6#Blast #Afghanistanblast #Kabul #Russianembassy pic.twitter.com/9TnFQKU75r
एक वर्षापूर्वी तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर काबूलमधील आपला दूतावास कायम ठेवणाऱ्या काही देशांपैकी रशिया आहे. मॉस्को अधिकृतपणे तालिबान सरकारला मान्यता देत नसले तरी ते पेट्रोल आणि इतर वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी अधिकार्यांशी करार करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये झालेल्या या हल्ल्याने रशिया आपला निर्णय बदलणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.