मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांनी प्रशासनात घेतली काश्मिरी तरुणी; कोण आहेत या समीरा फाझिली?

अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांनी प्रशासनात घेतली काश्मिरी तरुणी; कोण आहेत या समीरा फाझिली?

अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या नॅशनल इकॉनॉमिक काउन्सिलच्या (National Economic Council) उपसंचालकपदी जो बायडन (Joe Biden) यांनी भारतीय वंशाच्या समीरा फाझिली (Sameera Fazili) यांची नेमणूक केली आहे.

अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या नॅशनल इकॉनॉमिक काउन्सिलच्या (National Economic Council) उपसंचालकपदी जो बायडन (Joe Biden) यांनी भारतीय वंशाच्या समीरा फाझिली (Sameera Fazili) यांची नेमणूक केली आहे.

अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या नॅशनल इकॉनॉमिक काउन्सिलच्या (National Economic Council) उपसंचालकपदी जो बायडन (Joe Biden) यांनी भारतीय वंशाच्या समीरा फाझिली (Sameera Fazili) यांची नेमणूक केली आहे.

पुढे वाचा ...

वॉशिंग्टन, 15 जानेवारी : कोरोना विषाणू संकटामुळे जगभरातील मोठमोठ्या देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या आहेत. अमेरिकाही त्याला अपवाद नाही. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टिनेच त्यांच्या प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर अनुभवी व त्या विषयातील जाणकार लोकांची निवड करत आहेत. या आधी मूळचे भारतीय वंशाचे असलेले अनेक अमेरिकी नागरिक त्यांच्या प्रशासनात महत्त्वाच्या पदांवर विराजमान झाले आहेत. अमेरिकेची आर्थिक घडी नीट बसवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या नॅशनल इकॉनॉमिक काउन्सिलच्या (National Economic Council) उपसंचालकपदी बायडन यांनी भारतीय वंशाच्या समीरा फाझिली (Sam)यांची नेमणूक केली आहे. समीरा या मूळच्या काश्मिरी आहेत. मॅन्युफॅक्चरिंग, इनोव्हेशन आणि देशांतर्गत स्पर्धा या विषयांकडे समीरा विशेष लक्ष देणार आहेत. बायडेन यांच्या वतीने बुधवारी नेमणुकीची घोषणा करण्यात आली.

कोण आहेत समीरा?

तीन मुलांची आई असलेल्या समीरा फेडरल बँक ऑफ अटलांटामध्ये एंगेजमेंट फॉर कम्युनिटी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या विषयाच्या संचालक म्हणून काम केलं आहे. व्हाइट हाउसच्या नॅशनल इकॉनॉमिक काउन्सिलमध्ये वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रशासनातही त्यांनी एनईसी व ट्रेजरी डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे. त्या काळात त्यांनी डोमेस्टिक फायनान्स आणि इंटरनॅशनल अफेअर्स या विभागांत काम केलं आहे ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटलं आहे. हार्वर्ड कॉलेज आणि येल लॉ स्कूलमधील पदवीचं शिक्षण घेतलेल्या समीरा यांनी येल लॉ कॉलेजच्या कम्युनिटी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट क्लिनिकमध्ये क्लिनिकल लेक्चरर म्हणून करिअरची सुरुवात केली. न्यू यॉर्कमधील विल्यम्सव्हिलीमध्ये राहणाऱ्या युसूफ आणि रफिका फझिली यांच्या समीरा या कन्या होत. ट्रेझरी विभागात कम्युनिटी डेव्हलपमेंट, फायनॅन्शियल इन्स्टिट्युशन्सपासून ते हाउसिंग फायनान्स, बिझनेस फायनान्स या सगळ्या विषयाचं देशांतर्गत धोरण निश्चिती करण्यासाठी वरिष्ठ सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांनी कंझ्युमर, हाउसिंग, लघुउद्योग आणि मायक्रोफायनान्स या विषयांतही काम केलं आहे.

काश्मिरी वंशाच्या आयशा शाह यांचीही  नियुक्ती

या आधी बायडेन यांनी काश्मिरी वंशाच्या आयशा शाह यांचा व्हाइट हाउसच्या डिजिटल स्ट्रॅटर्जी टीममध्ये समावेश केला आहे. बायडेन ट्रांझिशन टीमने केलेल्या घोषणेनुसार शाह या व्हाइट हाउसमधील ऑफिसात पार्टनरशीप मॅनेजर म्हणून काम करतील. लुईसानातील मूळच्या शाह यांनी बायडन-हॅरिस यांच्या निवडणूक अभियानात पार्टनरशीप मॅनेजर म्हणून काम केलं आहे. त्या सध्या स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनमध्ये अडव्हान्समेंट स्पेशॅलिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

First published:
top videos

    Tags: Joe biden, United states, United States of America, USA