नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी (Twitter CEO Jack Dorcy resigns) यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. आता जगातल्या या मोठ्या कंपनीच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची वर्णी लागली आहे. Twitter चे नवे CEO म्हणून पराग अग्रवाल (Twitter CEO Parag Agrawal) यांना पदोन्नती देण्यात आली आहे. अग्रवाल हे ट्विटरचे CTO म्हणून काम पाहात होते. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांनुसार, जॅक डोर्सी हे Twitter बरोबरच स्वायरचे CEO म्हणून काम पाहात होते. हा एक डिजिटल पेमेंटचा प्लॅटफॉर्म आहे. डोर्सी यांनी CEO पद सोडलं असलं तरी ते Twitter च्या संचालक मंडळातले सदस्य म्हणून कायम असतील. 2022 पर्यंत तरी ते संचालक मंडळात असतील. Google पाठोपाठ आता twitter या जागतिक कंपनीच्या प्रमुख पदावर मूळ भारतीय व्यक्तीची वर्णी लागली आहे. google चे CEO म्हणून सुंदर पिचाई काम पाहात आहेत. आता Twitter ची कमानही पराग अग्रवाल या मूळच्या भारतीय व्यक्तीकडे गेली आहे. बातमी अपडेट होत आहे…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.