मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Prophet Remark: इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची माघार, भारत दौऱ्यावर येताच 'तो' मजकूर डिलिट

Prophet Remark: इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची माघार, भारत दौऱ्यावर येताच 'तो' मजकूर डिलिट

इराणचे (Iran) परराष्ट्रमंत्री हुसैन आमीर अब्दुल्लाह (Hussai Aamir Abdullah भारत दौऱ्यावर आले होते. . या दौऱ्यात इराणनं त्यांची भूमिका मवाळ करत माघार घेतली आहे

इराणचे (Iran) परराष्ट्रमंत्री हुसैन आमीर अब्दुल्लाह (Hussai Aamir Abdullah भारत दौऱ्यावर आले होते. . या दौऱ्यात इराणनं त्यांची भूमिका मवाळ करत माघार घेतली आहे

इराणचे (Iran) परराष्ट्रमंत्री हुसैन आमीर अब्दुल्लाह (Hussai Aamir Abdullah भारत दौऱ्यावर आले होते. . या दौऱ्यात इराणनं त्यांची भूमिका मवाळ करत माघार घेतली आहे

नवी दिल्ली : नूपुर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल (Naveen Jindal) या भाजपच्या दोन नेत्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर (Prophet Mohammad) वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पडसाद अनेक इस्लामिक देशांमधून उमटले. काही देशांनी आपापल्या देशांतल्या भारतीय राजदूतांना समन्स बजावले, तर काही देशांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर, इराणचे (Iran) परराष्ट्रमंत्री हुसैन आमीर अब्दुल्लाह (Hussai Aamir Abdullah) बुधवारी (8 जून) भारत दौऱ्यावर आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar), राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) आदींची त्यांनी भेट घेतली. दोन देशांतला व्यापार, कनेक्टिव्हिटी, दहशतवाद हे या भेटींमधले चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे होते; मात्र प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असल्याने त्याबद्दलही चर्चा होणं स्वाभाविक होतं. या चर्चेबद्दल इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं. त्या निवेदनातला काही भाग कमी करून नंतर त्यांनी सुधारित निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

इराणची माघार

पंतप्रधान मोदी, तसंच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेत अब्दुल्लाह यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला नाही; मात्र अजित डोवाल यांच्याशी झालेल्या चर्चेत त्या मुद्द्यावर चर्चा झाली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर बुधवारी त्याबद्दलचं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं होतं; मात्र गुरुवारी (9 जून) इराणनं या प्रकरणात माघार घेत त्या निवेदनातला वादग्रस्त वक्तव्याबद्दलचा काही भाग काढून टाकल्याचं उघड झालं आहे.

प्रेषित मोहंमद यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बिघडलेल्या वातावरणाचा उल्लेख बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या निवेदनात होता. तसंच, या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती डोवाल यांनी अब्दुल्लाह यांना दिल्याची माहितीही त्या निवेदनात होती. एकंदरीतच, त्या निवेदनात विस्तृतपणे याबद्दल लिहिण्यात आलं होतं. तेच निवेदन सुधारणा करून गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलं. त्यात मात्र डोवाल यांनी दिलेल्या उत्तराच्या काही भागाचाच समावेश आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना साप्ताहिक प्रेस ब्रीफिंगदरम्यान पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. तसंच, 'तुम्ही ज्याबद्दल बोलत आहात, तो भाग इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनातून हटवला असल्याची माझी माहिती आहे,' असंही त्यांनी सांगितलं.

पाकिस्तानात रात्री 10 नंतर लग्न करण्यास बंदी; सरकारच्या या निर्णयामागचं कारण जाणून व्हाल थक्क

इराणचे परराष्ट्रमंत्री आमीर अब्दुल्लाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि अन्य भारतीय अधिकाऱ्यांना भेटून आनंद झाला. द्विपक्षीय चर्चा आणखी पुढे नेण्याबद्दलही चर्चा झाली. सर्व धर्म, इस्लामिक प्रतीकं आदींचा सन्मान करण्याची गरज आणि नागरिकांमध्ये फूट पाडणाऱ्या वक्तव्यांपासून दूर राहण्याची गरज या दोन्हींबद्दल इराण आणि भारत हे दोन्ही देश सहमत आहेत,' असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, बागची म्हणाले, की एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या भेटीत या वादग्रस्त विषयाबद्दल काहीही चर्चा झाली नव्हती. तसंच, काही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं म्हणजे सरकारची भूमिका नव्हे, हेही सरकारने स्पष्ट केलं असल्याचं ते म्हणाले. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाईही करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Ajit doval, India, Iran