Home /News /videsh /

Yemen मधलं Internet अखेर सुरू, जनता भोगतेय Air Strike चे Side Effects

Yemen मधलं Internet अखेर सुरू, जनता भोगतेय Air Strike चे Side Effects

सौदी अरेबियानं गुरुवारी केलेल्या एअर स्ट्राईकमुळे येमेनमधील इंटरनेट ठप्प झालं होतं. चार दिवसांनंतर ते पूर्ववत झालं आहे.

    सना, 25 जानेवारी: सौदी अरेबिया (Saudi Arabia) गटाकडून करण्यात आलेल्या एअर स्टाईकनंतर (Air Strike) बंद असणारी येमेनमधील (Yemen) इंटरनेट सेवा (Internet service) अखेर चार दिवसांनंतर पुन्हा सुरू (Resumed) करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरु असणाऱ्या सौदी अरेबिया विरुद्ध इराण संघर्षाने गेल्या काही दिवसांत हिंसक रुप घेतलं आहे. गेल्या आठवड्यात सौदी अरेबिया गटानं येमेनमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमुळे इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. मात्र आता चार दिवसांनी ही सेवा पूर्ववत करण्यात येमेनला यश आलं आहे. काय आहे प्रकरण? येमेनमधील हौती गटानं अबुधाबी विमानतळावर ड्रोन हल्ला केल्याच्या घटनेला चार दिवसांपूर्वी सौदी अरेबियानं प्रत्युत्तर दिलं होतं. सौदी अरेबियानं येमेनमधील वेगवेगळ्या प्रांतात हवाई हल्ले केले होते. यात अनेकजण बळी पडल्याचा दावा येमेनकडून कऱण्यात आला होता. येमेनची राजधानी सना आणि मुख्य शहर होडिदामध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. चार दिवस हाहाकार इंटरनेट बंद झाल्याचा मोठा फटका येमेनला गेल्या चार दिवसांत बसला आहे. अनेक मूलभूत आणि पायाभूत सुविधांचा पुरवठा हा इंटरनेटच्या माध्यमातून सध्या केला जातो. मात्र नेटच बंद असल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक व्यवहारांपासून ते पाणीपुरवठ्यापर्यंत अनेक बाबाींवर या गोष्टीचा परिणाम झाला होता. माध्यमांनाही तिथून काम करणं कठीण झालं होतं. विशेषतः आंतरराष्ट्रीय पत्रकारांना आपल्या बातम्या कार्यालयापर्यंतही पोहोचवता येत नव्हत्या. होडिदावर हल्ला येमेनमधील इंटरनेटचे बहुतांश सर्व्हर हे होडिदा शहरातमध्ये आहेत. सौदी अरेबियाच्या लढाऊ विमानांनी याच भागात बॉम्बवर्षाव केला होता. इंटरनेटचे सर्व सर्व्हर आणि मुख्य टॉवर या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. इंटरनेट सेवा ठप्प करण्याच्या उद्देशानंच हा हल्ला करण्यात आला असल्याचा दावा येमेननं केला आहे. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात परिसरात खेळत असलेल्या तीन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. हे वाचा- लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी ब्रिटीशांचे दरवाजे पुन्हा खुले, असे बदलले नियम हल्ल्यांची मालिका येमेनकडून अबुधाबीवर ड्रोन हल्ला झाल्यानंतर हल्ल्यांची मालिकाच सुरू झाली आहे. या हल्ल्याच्या उत्तरादाखल सौदी गटाकडून गेल्या गुरुवारी येमेनवर एअरस्ट्राईक करण्यात आला होता. याच वेळी सादा भागातील तुरुंगावरही बॉम्ब हल्ला झाला होता आणि त्यात 70 नागरिकांचा मृत्यू झाला होता. मात्र आपण हा हल्ला केलाच नसल्याचा दावा सौदी अरेबियानं केला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: AIR STRIKE, Internet, Iran, Saudi arabia, Yemen airport attack

    पुढील बातम्या